सौ के एस के महाविद्यालयातील कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना धनादेश वाटप
बीड : येथील सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात व विद्यार्थी कल्याण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यासाठी कमवा व शिका योजना प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील ग्रंथ साफ सफाई करणे, कोंडिग करणे, परिसर स्वच्छ करणे, झाडांना पाणी देणे, बागेतील कचरा साफसफाई करणे, विविध प्रयोगशाळेत स्वच्छतेचे काम करणे या वेगवेगळया विभागात कमवा व शिका या योजने अंतर्गत काम केले. त्या बद्दल त्यांना महाविद्यालयाच्या वतीने धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यात महाविद्यालयातील विद्यार्थी पारवे मोनिका, जोगदंड स्नेहल, शेळके संध्या, मसकर गौरी, चव्हाण शितल,गायकवाड सागर, क्षीरसागर अविष्कार, हिरे दिशा, डंबाळे आकांक्षा, यादव आरती, गव्हाणे आरती, वाघमारे साक्षी, सुर्यंवंशी सिध्देश्वर, कोकाटे निकिता, खाडे निकिता, मस्के धनंजय या गरजू विद्यार्थ्यांना काम करून शिकण्याची सोय आहे.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ. सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, डॉ. सुधाकर गुट्टे, कार्यालयीन अधिक्षक डॉ. विश्वांभर देशमाने तसेच कमवा शिका योजनेचे प्रमुख दीपक जमधाडे व सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते.