एमजीएम व्यवस्थापनशास्त्र विभागामध्ये दोन दिवसीय बिल्डिंग सस्टेनेबल फ्युचर्स समीट संपन्न
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चमध्ये दिनांक १ व २ मार्च २०२४ दरम्यान दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बिल्डिंग सस्टेनेबल फ्युचर्स या विषयावर परिषद संपन्न झाली. परिषदेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. विजया देशमुख तसेच आआयएम लखनौचे प्रा. क्रिती बर्धन गुप्ता, वर्ल्ड युनिर्व्हसिटी ऑफ डिझाईनच्या अधिष्ठाता प्रा. संन्मित्रा चित्ते व प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
अधिष्ठाता डॉ. विजया देशमुख यांच्या प्रास्ताविकानंतर प्रा. क्रिती बर्धन गुप्ता यांनी भगवत गिता आणि शाश्वत दृष्टीकोन यावर भाष्य केले. ऑस्ट्रलिया येथून प्रो. मार्क वॉटसन यांनी ऑनलाईन संबोधित करताना कोणतेही प्रोडक्ट आणि साधणांचा वापर करतांना डिझाईनचे महत्व शाश्वततेला धरून विषद केले. यानंतर प्रा. मार्को वेव्होलो यांनी युरोप वरून शाश्वत डिजीटल उत्पादने आपले जीवनमान उंचावू शकतात हे विषद केले. प्रो. सन्मित्रा चित्ते यांनी शाश्वतता हा पर्याय नसुन गरज बनली आहे हे विषद केले.
परिषदेच्या दुस-या दिवशी प्रा. देसरडा यांनी आर्थिक वाढीपेक्षा सामाजिक विकासाचे शाश्वततेसाठी महत्व विषद केले. आयआयएम अहमदाबादचे प्रा.अत्तनू घोष यांनी ब्ल्यु ओशन स्ट्रटेजी वापरून शाश्वतता अवलंबली जावू शकते यावर भाष्य केले. दुपारच्या सत्रामध्ये विविध महाविद्यालय आणि औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणा-या संशोधकांनी शाश्वतत्तेवर आपले रिसर्च पेपर सादर केले.
कार्यक्रमाची सांगता सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रे देवून तसेच आभार प्रदर्शनाने झाली. यावेळी एमजीएम संस्स्थेचे विविध पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.