स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ द्वारा राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराचे थाटात उद्घाटन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ द्वारा संचलित न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने औंढा तालुक्यातील हिवरा जटू या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिर ‘युवकांचा ध्यास- ग्राम शहर विकास’ या शुभारंभाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. हिवरा जटू गावातील हनुमान मंदिरा शेजारी शिबिराच्या उद्घाटनाचा समारंभ आयोजित केला होता. हिंगोली तालुक्याचे नायब तहसीलदार नकुल पोळेकर यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी न्यू मॉडेल डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. सोळंके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मुरलीधरराव जायभाये अधिसभा सदस्य, डॉ. सचिन हटकर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक हिंगोली, दामोधर गोरे ग्रामसेवक (हिवरा जाटू), गावातील प्रतिष्ठित नागरिक रुस्तुमरावजी शिंदे, किसन शिंदे, त्र्यंबकराव शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवन वासनिक व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनील हजारे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, स्वयंसेवक, विद्यार्थी व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाल व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अंतिम भागात हिवरा जाटू यागावातील स्मशानभूमी जवळील रिकाम्या जागेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एल. पुरी यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. पवन वासनिक व आभार प्रदर्शन डॉ. अतिश कदम यांनी केले.
सात दिवसीय या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवन वासनिक व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनील हजारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे.