संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील दृकश्राव्य सभागृह (ए व्ही थिएटर) चे नूतनीकरण
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह (ए व्ही थिएटर) चे नूतनीकरण विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे उपाध्यक्षक प्रो. दिपक कुमार श्रीवास्तव यांचे शुभहस्ते करण्यात आले. फित कापून तसेच नामफलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, डॉ. भैय्यासाहेब मेटकर, डॉ.आर.डी. सिकची, डॉ.डी.डब्ल्यु. निचित, डॉ. अविनाश बोर्डे, डॉ.व्ही.एच. नागरे, डॉ.एच.एम. धुर्वे, डॉ.यु.बी. काकडे, प्रो. अनुपमा कुमार, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. तनुजा राऊत, डॉ. मोना चिमोटे, सौ. मोनाली तोटे पाटील व डॉ. नितीन कोळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दृकश्राव्य सभागृहाची वैशिष्ट्ये
दृकश्राव्य सभागृहाची आसन क्षमता 180 व्यक्तींची असून या सभागृहाची वैशिष्ट्ये म्हणजे याठिकाणी डी. एल. पी. प्रोजेक्टर स्क्रीन लावण्यात आली आहे. सभागृह पूर्ण वातानुकूलीत असून दर्जेदार ध्वनीक्षेपण यंत्रणेने सुसज्ज झाला आहे. इंटरनेटची सुविधा तेथे उपलब्ध करुन देण्यात आली असून व्ही. व्ही. आय. पीं. च्या प्रतिक्षेसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, आरामदायी आसन व्यवस्था, पुरेशी पार्किंगची व्यवस्था, याशिवाय पॅन्ट्री क्षेत्र आदींची व्यवस्था केली आहे.
या सभागृहाच्या संपूर्ण कामासाठी अंदाजे 90 लक्ष रूपयांचा खर्च झाला असून यामध्ये रुसा आणि विद्यापीठ निधीतून खर्च करण्यात आला आहे. प्रशस्त सभागृहाचे इंटेरिअर डेकोरेशन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले असून आर्किटेक्ट जयंत इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मेहत्रे, तर उपअभियंता डोमकाळे यांनी काम पाहिले. सभागृहाच्या कामासाठी विद्यापीठातील कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, उपअभियंता (विद्युत) राजेश एडले, अभियंता संजय ढाकुलकर, विजय चवरे, आकाश सोळंके आदींनी परिश्रम घेतलेत.