अमरावती विद्यापीठातर्फे यवतमाळ येथे पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन
18 कंपन्या, 1234 पद
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय व लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 01 मार्च, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. यवतमाळ येथील लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय येथे पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये 18 कंपन्या सहभागी होणार असून 1234 पदांसाठी युवक-युवतींच्या मुलाखती कंपन्यांकडून घेण्यात येणार आहे. मेळाव्यात नियुक्त झालेल्या युवक-युवतींना कंपन्यांच्या नियमानुसार वेतन दिले जाणार आहे.
मेळाव्यामध्ये सव्र्हेअर, मॅनेजर, सुपरवायझर, इलेक्ट्रिशियन, रिसेप्सनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, नर्सिंग, कस्टमर केअर, अॅप्रेन्टीस, ट्रेनी-ज्युनियर इंजिनिअर, ट्रेनी, मर्चंट, ट्रेनर, फिल्ड ऑफिसर, असिस्टंट सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिकेटिव्ह, नेटवर्क कोऑर्डिनेटर, ऑपरेटर, अकाऊंटंट, टेली कॉलर, फिल्ड फॅसिलेटर, नॅप्स ट्रेनी, ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, सेल्स ट्रेनी, मार्केटिंग एक्झिकेटिव्ह, हेल्पर, सिक्युरिटी गार्ड, मेसन, फिटर, कारपेंटर, ब्राँच मॅनेजर, असिस्टंट ब्राँच मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर अशा 1234 पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले असून त्यांचेशी 8855083964 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल