मिल्लिया महाविद्यालयात 10 वी राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

बीड : येथील मिल्लिया कला विज्ञान व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अहमद बीन अबुद चाऊस यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आयक्यूएसी व विज्ञान मंच (सायन्स फोरम) यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शन-रिसेंट ट्रेंडस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी- 2024 (Recent Trends in Science and Technology) ऑनलाइन स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. ऑनलाइन स्पर्धेसाठी संयोजक प्रा. शेख नईम व आयोजन सचिव डॉ. रमेश वारे यांनी परिश्रम घेतले. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात संपूर्ण भारतातील विविध महाविद्यालयांमधून 65 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व पोस्टर स्क्रीनिंगच्या अधीन होते आणि दुसऱ्या टप्प्यात अंतिम सादरीकरण आयोजित केले गेले  होते.

विद्यार्थ्यांचे पोस्टर्स व सादरीकरण यांच्या कामगिरीवर विजेते घोषित करण्यात आले. जैवविज्ञान ( life Science) ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक कु.बागवान मसिरा, नजिफा तहसीन, पठाण नौशीन फातेमा (मिल्लीया महाविद्यालय, बीड) द्वितीय क्रमांक कु. गोरेकर तूबा, अन्सारी नुझत कौसर, अन्सारी मरियम (जी.एम. मोमीन वुमेन्स कॉलेज भिवंडी), तृतीय क्रमांक कु. काझी शिफा, खान बिस्मा, पिंजारी हिना (जी.एम.मोमीन वुमेन्स कॉलेज भिवंडी) यांना, उत्तेजनार्थ कु. निकिता काकणले, खान मसिरा (पूना कॉलेज पुणे) व शेख सायरा बानो, मोमीन सारा, खान अजका (जी.एम.मोमीन वुमेन्स कॉलेज भिवंडी) तसेच जैवविज्ञान व्यतिरिक्त (other than life Science) ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक खत्री मैमूना (जी.एम. मोमीन वुमेन्स कॉलेज भिवंडी) द्वितीय क्रमांक बेग रूषबा एजाज अहमद, शेख मंताशा (जी.एम.मोमीन वुमेन्स कॉलेज भिवंडी) तृतीय क्रमांक संयुक्तिक शेख अस्मत जहाँ अब्दुल रौफ  (मिल्लिया महाविद्यालय बीड) व मुंगले काशिफ, मणियार जुनेद (राजश्री शाहू महाविद्यालय लातूर) यांना, उत्तेजनार्थ खतीजा जुबेर, नाझिष इम्तियाज (पूना कॉलेज पुणे) व सय्यद तुबा, शेख रूषा, अन्सारी झैनाब (जी.एम. मोमीन वुमेन्स कॉलेज भिवंडी) यांना मिळाला. तसेच श्रेष्ठता चषक (Excellence Trophy) जी.एम.मोमीन वुमेन्स कॉलेज भिवंडी यांना देण्यात आली. 

Advertisement

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.एम.ए.साखरे (बलभीम महाविद्यालय बीड) डॉ.तन्वीर पठाण (कालिका देवी महाविद्यालय शिरूर कासार) प्राध्यापिका डॉ. एस.एस. भोसले (बलभीम महाविद्यालय बीड), प्राध्यापिका डॉ. पी.आर.महीशमाळकर (के.एस.के. महाविद्यालय बीड), प्रा. शेख नईम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व पोस्टर्सचे मूल्यमापन केले. ऑनलाइन जाहीर झालेल्या राष्ट्रीय पोस्टर प्रदर्शन स्पर्धेची बक्षिसे, स्मृतीचिन्ह व श्रेष्ठता चषक  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व संबंधित महाविद्यालयाला कुरिअरद्वारे लवकरच पाठविली जाईल.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सलीम बीन अहमद बीन महफुज, सचिव श्रीमती खान सबिहा, संचालक डॉक्टर शेख समीर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ, उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एसएस, संयोजक प्रा. शेख नईम, आयोजन सचिव डॉ.रमेश वारे, सायन्स फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर ए.जे.खान, नॅक समन्वयक डॉ. अब्दुल अनिस, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रोफेसर फरीद अहमद नेहरी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page