अमरावती विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाचे तीन विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. हरिओम मुकुंंदराव वांगे हा विद्यापीठाच्या उन्हाळी 2023 परीक्षेत प्रथम, तर योगेश रामभाऊ बुगल व दिनेश मनोहर वानेरे अनुक्रमे तिसरा व सातव्या स्थानी आले आहेत. हरिओम याला विद्यापीठातर्फे डॉ कुसुमताई वामनराव कोरपे सुवर्णपदक जाहीर झाले आहे. विद्यापीठात 2017 मध्ये पदव्युत्तर राज्यशास्त्र विभाग सुरू झाला व या विभागाचा हरिओम वांगे हा पहिला सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.

Advertisement

योगेश बुगल याने सेट परीक्षेत यश संपादन केले आहे, तर दिनेश वानेरे आणि हरिओम यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सहभागी होण्याचा मान प्राप्त केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विभागाचे समन्वयक डॉ. प्रणव कोलते यांनी अभिओनंदन केले आहे. शिक्षक महेंद्र भगत, रोहिणी गायधने, डॉ. गजानन ढवळी, डॉ. सपना रोंघे, हर्षवर्धन रोटे यांचे विद्याथ्र्यांना मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page