बी जी पी एस बी एड महिला महाविद्यालयत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा.
छत्रपती संभाजीनगर : भारतीय ग्रामीण पुनर्ररचना संस्थेच्या बी एड महिला महाविद्यालयात ‘उडान-स्वप्न नवे ऐक्य हवे’ या विचारांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. बी जी पी एस महिला बी एड महाविद्यालय (एसएनडीटी महिला विद्यापीठ संलग्न) छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित बी एड कॉलेज आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कॉलेजमध्ये वार्षीक स्नेहसंमेलन उत्साहि वातावरणात पार पडले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ जे के जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून जनता महिला कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्री रामकिशन दहिफळे, डॉ टेकाळे आर व्ही, डॉ मठपती व्ही के, तृप्ती विक्रांत जाधव, प्राचार्या डॉ सौ चौधरी के एम यांची प्रमुख उपस्थिती होती. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये बी एड प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीनी नृत्य, गायन, वेशभूषा, भारूड, एकपात्री यामध्ये सहभाग नोंदवला.
कार्यकम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमूख प्रा निर्मला राऊत (काठुळे) प्रा डॉ पुजा कातकडे, प्रा निलेश पुरे, प्रा शोभा पवार, प्रा उषा परघणे, प्रा पूजा खरात, अक्षय चन्ने, योगिता निळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा दिवटे, बुरपल्ले ज्योती, प्रतिक्षा ढसाळ, सारीका गरजे यांनी तर आभार प्रदर्शन भारती पळसकर यांनी केले.