अमरावती विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन 28 फेब्राुवारीला

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 28 फेब्राुवारी, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता विद्यापीठातील डॉ. के. जी. देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले असून ‘भारताच्या विकासासाठी स्वदेशी तंत्रज्ञान’ ही थीम यावर्षीसाठी ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबईचे सल्लागार डॉ. अरुण सप्रे उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांची कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

Advertisement
Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

या कार्यक्रमांतर्गत दि. 28 फेब्राुवारी रोजी लोकप्रिय विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनी, दि. 2 मार्च रोजी इंटरनेट गप्पा सत्र – विद्यार्थी क्रियाकलाप, दि. 4 मार्च रोजी विद्याथ्र्यांसाठी निबंध लेखन स्पर्धा उपक्रम, दि. 5 मार्च रोजी परिसंवाद सादरीकरण स्पर्धा – विद्यार्थी क्रियाकलप, दि. 7 मार्च रोजी लोकप्रिय व्याख्याने, प्रात्यक्षिके, प्रदर्शने व दि. 15 मार्च रोजी पोषण, आहार व मानवी हक्क शिक्षण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समारोपीय व बक्षीस वितरण समारंभ दि. 19 मार्च, 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता विद्यापीठातील डॉ.के.जी. देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून एस.पी.के. कृषी तंत्रज्ञान, अमरावतीचे पद्मश्री गुरूजी सुभाष पाळेकरजी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.

तरी राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. अनिता पाटील यांनी विद्यापीठाच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page