गोंडवाना विद्यापीठात पीएम – उषा योजना लोकार्पण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात
नवीन भारत सध्याच्या पिढीला आधुनिक शिक्षण देण्यासाठी अधिक खर्च करत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पी एम उषा योजनेअंतर्गत विद्यापीठ विकासासाठी १०४ कोटी
गडचिरोली : २०१४ पूर्वी जम्मू काश्मीर मध्ये फक्त ४ वैद्यकीय महाविद्यालयं होती आज ही संख्या १२ वर गेली आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांत देशात विक्रमी संख्येने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे बांधण्यात आली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ५० नवीन पदवी महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, ज्यामुळे येथील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर चांगले शिक्षण मिळण्यास मदत झाली आहे. आज जम्मू आणि काश्मीरमध्ये IIM आणि IIT सारख्या उच्च शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे वचन पूर्ण झाले आहे. यासोबतच देशभरात विविध ठिकाणी स्थापन झालेल्या इतर संस्थांचेही उद्घाटन करण्यात आले आहे. आज शिक्षण क्षेत्रातील विविध योजना देशाला समर्पित करताना मला हर्ष होतो आहे. जम्मू आणि काश्मीर हे शिक्षण आणि कौशल्य विकासाचे मोठे केंद्र बनले आहे. नवीन भारत सध्याच्या पिढीला आधुनिक शिक्षण देण्यासाठी अधिक खर्च करत आहे.असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर येथे पीएम उषा योजना तसेच विविध परीयोजनांचे लोकार्पण करतांना दुरदृश्यप्रणाली द्वारे केले. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने शहरातील सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, येथे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
तत्पूवी सकाळी ११:०० वाजता कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी संबोधित केले.
पी एम योजनेविषयी माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रशांत मोहिते यांनी दिली. विवेक गोर्लावार यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक पी एम उषा विनायक निपुण, नंदाजी सातपुते, यांनी विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संदेश दिला. याप्रसंगी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, खा. अशोक नेते, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत मोहिते, विवेक गोर्लावार, नंदाजी सातपुते विवेक जोशी, वित्त व लेखाधिकारी सी. ए. भास्कर पठारे, अधिष्ठाता मानवविज्ञान विद्या शाखा डॉ. चंद्रमौली उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे सभागृहाला संबोधित करताना म्हणाले, आजचा दिवस हा गोंडवाना विद्यापीठाच्या एकंदर वाटचालीमध्ये मैलाचा दगड ठरणारा दिवस आहे. याचे कारण असे की महाराष्ट्राच्या सर्वदूर पूर्वेला असलेल्या गडचिरोली जिल्हा आणि त्या सीमावर्ती क्षेत्रातील गोंडवाना विद्यापीठ . जर गेल्या बारा वर्षांचा विचार आपण केला तर विद्यापीठ क्षेत्राचा विकास फारसा झालेला नाही. विद्यापीठाच्या नवीन परिसरासाठी १७० एकर जागा विकत घेतली तसेच चंद्रपूर येथील उपकेंद्रासाठी १०८ एकर जागा घेतलेली आहे. या संदर्भात विद्यापीठ विकासासाठी १०० कोटीचे आणि मॉडेल कॉलेज साठी ४ कोटी निधी विद्यापीठ विकासामध्ये निश्चितपणे मोलाचे योगदान देईल मी राज्य शासनाचे तसेच केंद्र शासनाचे आभार मानतो की, त्यांनी विशेषत्वाने गोंडवाना विद्यापीठाकडे लक्ष दिले. त्याचा वापर करून विद्यापीठ आपली पुढची वाटचाल समर्थपणे करेल यात शंका नाही आणि तिचा मुख्य उद्देश म्हणजे केवळ इमारती बांधणे नसून येथील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे आणि रोजगार क्षम बनवणे हा आहे.असे ते म्हणाले.
संचालन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गणमान्य नागरिक ,विद्यार्थी, प्राचार्य ,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात घेतला.