विवेकानंद महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
छत्रपती शिवराय स्वकर्तृत्वाने राजे झाले – डाॅ संजय गायकवाड
छत्रपती संभाजीनगर : “छत्रपती शिवराय हे स्वकर्तृत्वाने राजे झाले. जागतिक इतिहासात जेवढे राजे झाले त्यापेक्षा शिवचरित्र हे हिमालयाच्या उंचीचे आहे” असे गौरवोद्गार डाॅ. संजय गायकवाड यांनी काढले. विवेकानंद महाविद्यालयात शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. दादाराव शेंगुळे होते. व्यासपीठावर उपप्राचार्या डॉ. अरुणा पाटील, डाॅ. टी. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रदिप पाटील यांची उपस्थिती होती. “शिवचरित्रातून काय शिकावे?” या विषयावर डाॅ. संजय गायकवाड यांनी दिलेल्या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस पालखीतून छत्रपती शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. या पालखीपुढे लेझीम, दिंडी पथक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे देखावे होते. विद्यार्थ्यांनी मावळ्यांचे पोशाख घालून लेझीम,काठी लाठीची प्रत्यक्षिके सादर केली. वारकरी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रास्तविक डाॅ. टी. आर. पाटील यांनी केले तर डाॅ. इरफान शेख यांनी आभार मानले. प्रा. स्विटी शेडगे यांनी सूत्रसंचालन केले.