अमृत क्रीडा व कला महोत्सवाची सांगता : क्रिकेट स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ संघ प्रथम
खेळ व कलेमुळे सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो – पद्मश्री डॉ. परशुराम खुणे
गडचिरोली : खेळ व कला यामुळे जीवनाकडे पाहण्यास सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो असे मत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनी व्यक्त केले. गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित अमृत क्रीडा व कला महोत्सवाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. विद्यापीठ प्रांगणात पार पडलेल्या समारंभामध्ये खुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीकेट स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक गोंडवाना विद्यापीठाच्या संघाने पटकाविले.
याप्रसंगी झाडीपट्टीचे कलाकार युवराज प्रधान, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे, गोंडवाना विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सतिश पडोळे, चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे महासचिव अरुण जुनघरे, गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष निलेश काळे, मराठी विभागाचे स. प्रा. नीळकंठ नरवाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी परशुराम खुणे म्हणाले, अमृत क्रीडा व कला महोत्सव म्हणजे विद्यापीठाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपजत कलांना वाव देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ आहे. हार ही एक अर्थी माणसाची जीत असते कारण खिलाडूवृत्तीमुळे आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते आणि आत्मपरीक्षणामधून माणसाला जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन सापडतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिस्पर्धी ही भावना न निर्माण होता, आपुलकीची व स्नेहाची भावना निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाकडून स्पर्धेऐवजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. हार किंवा जीत याचा विचार न करता मिळालेल्या पुरस्कारातून प्रेरणा घ्यावी. कर्मचाऱ्यांचे सादरीकरण व उत्साह यामधून कलेला व खेळाला वयाचे बंधन नसते याची प्रचिती आली. सरावामुळे शरीरासोबतच मनाचाही व्यायाम होतो. निरोगी आयुष्यासाठी कला व खेळ हे खूप महत्त्वाचे असून सांघिक वृत्तीमुळे सशक्त समाज निर्माण होण्यास मदत होते. युवराज प्रधान म्हणाले, एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न केले तर ती गोष्ट माणूस साध्य करु शकतो. माणूस आपल्या चुकांमधून व आलेल्या अपयशांमधून शिकत असतो. फळाची अपेक्षा न करता कष्ट करत राहिल्यास माणसाला फळ हे मिळतेच.
कर्मचारी संघटनेच्या मागणीला मान्यता देऊन गेली तीन वर्ष सातत्याने या महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले जात असल्याने अरुण जुनघरे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांचे आभार व्यक्त केले. तर चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्यावतीने या यशस्वीतेबद्दल विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, संचालक डॉ. अनिता लोखंडे, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते क्रीकेट, खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, दौड, रस्सीखेच, बॅडमिंटन, संगीत खुर्ची तसेच एकल व समुह गीत गायन, एकल व समुह नृत्य, एकपात्री व लघु नाटिका आदी स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनिता लोखंडे यांनी केले. संचालन व आभार मनिषा फुलकर यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यापीठातील तसेच सलंग्नित विविध महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते
क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक गोंडवाना विद्यापीठ, द्वीतिय चिंतामणी महाविद्यालय , पोभुर्णा उत्कृष्ट खेळाडू अनिल चव्हाण , गोंडवाना विद्यापीठ,
पुरुषांच्या व्हालीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाल गौरकार व संघ, निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती, व्दितीय क्रमांक प्रविण पहानपटे व संघ गोंडवाना विद्यापीठ, सर्वोत्तम खेळाडू विशाल गौरकार निळकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती, सचिन मून , गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली
पुरुषांच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक(गट ३५ – ४५) प्रफुल्ल थुटे, बेस्ट प्लेयर,आंदनिकेतन महा. वरोरा, (४५-६०)कालीचरण धेंगळे,जनता महाविद्यालय,महिलांमध्ये प्रथम अमिता बोलगोडवार , प्रथम अश्विनी मरसकोल्हे, गोंडवाना विद्यापीठ ,
पुरुषांच्या रस्साखेच स्पर्धेत प्रथम बंटी पवार व संघ गोंडवाना विद्यापीठ , व्दितीय प्रशांत रंदई, महिलांमध्ये प्रथम बबिता दुपारे व संघ, गोंडवाना विद्यापीठ , द्वितीय संगीता ठाकरे व संघ ने. ही. महाविद्यालय,ब्रम्हपूरी
संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचिता मोरे, गोंडवाना विद्यापीठ, द्वितीय नीलिमा नरोले, गोडंवाना विद्यापीठ, पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत शुभकांत शेरकी व संघ महात्मा गांधी महा. गडचांदूर , द्वितीय प्रफुल्ल थुटे व संघ, आंनदनिकेतन महा. वरोरा ,बेस्ट रायडर रमेश मांडवकर , महात्मा गांधी महा. गडचांदूर, बेस्ट डीपेंडर
शुभकांत शेरकी महात्मा गांधी, गडचांदूर,
बॅटमिंटन
प्रथम रूपेश चामलाटे, आलोक मेश्राम,ने. ही. महा. ब्रम्हपूरी,द्वितीय घनश्याम वाघरे, राहुल पगाडे , गोंडवाना विद्यापीठ, महिलांमध्ये प्रथम नीलिमा नागरकर , विजयालक्ष्मी परचाके, गो. वि., द्वीतिय वैशाली कोटनाके, वनश्री बोबटे, गो. वि. गडचिरोली
कला प्रकारात एकल गीत गायन प्रथम अमित अमृतकर ,द्वितीय
द्वीतिय हीरालाल वाघमारे, एसआरएम समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर ,
समुह गित गायन
डॉ. संदेश सोनुले व संच गोंडवाना विद्यापीठ ,द्वीतिय अमित अमृतकर , एसआरएम समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर
एकल नृत्य प्रथम सत्यम नरगडे, द्वितीय नीलिमा नागरकर,गोंडवाना विद्यापीठ,समुह नृत्य मनीषा फुलकर व संच गोंडवाना विद्यापीठ,द्वितीय वंदना सिडाम व संच एस. आर. एम. समाजकार्य महा. पडोली, चंद्रपूर,
एकपात्री नाटिका प्रथम
शबाना परवीन शेख गुलाब, महात्मा गांधी महा, गडचांदूर,
द्वीतिय डॉ. संदेश सोनुले, गो. वि.गडचिरोली
अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात सर्व खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले.