उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभागाच्यावतीने सुर्यनमस्कार साधनेचा समारोप
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्यावतीने दिनांक ४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आलेल्या सुर्यनमस्कार साधनेचा समारोप १६ फेब्रुवारी रोजी गांधी टेकडीवर करण्यात आला.
या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रभारी अधिष्ठाता डॉ. साहेबराव भुकन, आंतर विद्याशाखीय अभ्यास प्रशाळेच्या संचालक डॉ. मनीषा इंदाणी, योगशास्त्र विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील, डॉ. कैलास दांडगे उपस्थित होते. डॉ.विनोद पाटील यांनी योगशास्त्राचे महत्व सांगितले. डॉ. भुकन व डॉ. इंदाणी यांनीही मनोगत व्यक्त केले. रासेयोच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्लास्टीक मुक्त भारत या विषयावर पथनाटय सादर केले. डॉ.लीना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यनमस्कार साधना घेण्यात आली. प्रा. गितांजली भंगाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन आभार मानले.