देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : प्रादेशिक परीवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालाया अंतर्गत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दि. 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आला. व या अभियानाची सांगता देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र माहविदयालयात संपन्न झाली. या अभियानाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये विना अपघात सेवा देणारे चालक, रस्ता अपघातात इतरांचे जीव वाचवणारे जिवनदुत, नुकताच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एल. पी. जी. गॅस अपघातात ज्या योध्दांनी संपुर्ण शहराचे रक्षण केले त्या सर्व योध्दांचे सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दरम्यान प्रादेशिक परीवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी नागरीकांमध्ये रस्ता अपघाताबद्दल जागृकता वाढावी म्हणुन विविध कार्याक्रमाचे आयोजन केले होते. यात पोस्टर प्रेजेटेशन आणि रिल्स कॉम्पिटेशन घेतले व विजेत्या विद्यार्थ्यांना पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी मोठयाप्रमाणात सहभाग नोंदविला. या कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे डिन ॲकॅडमिक्स डॉ. सुभाष लहाने होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन परिवहन अधिकारी थोरात (ए.सी.पी. ट्राफिक), श्रीकांत डिसले (डी.वाय.एस.पी. महामार्ग पोलीस), विजय काठोळे (प्रादेशिक परिवण अधिकारी), सचिन क्षीरसागर (विभागीय नियंत्रक, एस.टी. महामंडळ), धीरज दौड (ए.आर.टी.ओ), सविता पवार (ए.आर.टी.ओ) हे उपस्थित होते.
या अभियानाचे आयोजन केल्याबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाशदादा सोळुंके, सचिव सतीश चव्हाण, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारीणी सदस्य विश्वास येळीकर, प्रदीप चव्हाण, व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साक्षी शिंदे व निकीता डोंगरे या विद्यार्थीनीनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविदयालयाचे प्रा. अच्युत भोसले (विभाग प्रमुख स्टुडंट अफेर विभाग), प्रा. अनिल रोकडे (इंचार्ज राइडर क्लब) यांनी परीश्रम घेतले.