शिवाजी विद्यापीठात धिंगरी अळीबी (Oyster Mushroom) लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एसयूके रिसर्च अँड डेवलपमेंट फाऊंडेशन व अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभाग तसेच अखिलभारतीय संशोधन केंद्र, कृषि महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत धिंगरी अळीबी (ओस्टर मशरूम) लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शकाकडून धिंगरी अळीबी लागवडीबाबतचे तांत्रिकरीत्या व प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, अनुसूचित जातीच्या ५० प्रशिक्षनार्थीना अळीबी लागवडीचे प्राथमिक स्तरावर वापरण्यात येईल असे किट देखील दिले जाईल.
तरी या प्रशिक्षणास आपल्याकडून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी आपल्याकडील विध्यार्थी / शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी व इतर इच्छुक उमेदवाराना प्रशिक्षणास नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.