श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या प्रा ब्रम्हनाथ मेंगडे यांना उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्रदान
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +2स्तर विभागाचे जिल्हा समन्वयक व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा ब्रम्हनाथ मेंगडे यांना शिक्षण संचालनालय व अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शिबिर विवेकानंद आश्रम हिवरा (बुद्रुक) तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे पार पडलेल्या शिबिर कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागातून शैक्षणिक वर्ष 2021-2022 चे उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र शाल देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे हे श्री बंकटस्वामी महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रमाधिकारी व जिल्हा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, एड्स जनजागृती,देवस्थान पर्यटन स्थळ स्वच्छता ,परिसर स्वच्छता घनवन लागवड तसेच पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती अशा स्वरूपाचे अभियान त्यांनी राबविले आहेत.तसेच सामाजिक कार्यात देखील नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात सर्व परिचित आहेत. तसेच राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक म्हणून सध्या त्यांच्याकडे जबाबदारी आहे. या कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना पुरस्कार प्रदान केला.

त्यांच्या या यशाबद्दल श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेचे सचिव आर. एच. भोसले साहेब उपाध्यक्ष विक्रम (अण्णा) भोसले सहसचिव डॉ. प्रकाश भोसले प्रा. विजयकुमार भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, प्रा. बन्सी काळे (माजी उपप्राचार्य,) वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना बीड जिल्हा समन्वयक डॉ. अरुण दैतकार पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्रशासकीय कर्मचारी प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते.