यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयएटीई ची ५६ वी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा. राम ताकवले संशोधन केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स (IATE) यांच्या संयुक्त विद्यमाने आयएटीई ची ५६ वी राष्ट्रीय परिषद यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे दि. १० ते १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परिषदेचा विषय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – 2020 (National Education Policy-2020) मधील महत्त्वपूर्ण संकल्पना “भारतीय ज्ञान प्रणाली (IKS): शिक्षक, अध्यापन आणि अध्ययन” (Indian Knowledge System (IKS): Teacher, Teaching and Learning) असा आहे.
परिषदेचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता, मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीच्या सभागृहात होणार आहे. या परिषदेस चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन हे संध्याकाळी 4.00 वाजता उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे असतील, तसेच प्रा. मोहम्मद मियान, अध्यक्ष, आयएटीई, नवी दिल्ली यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. शशिकला वंजारी, कुलगुरू, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन, नवी दिल्ली ह्या असणार आहे. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, इमरटस प्रोफेसर कविता साळुंके, संचालक, स्कुल ऑफ ऑनलाईन लर्निंग आणि प्रा. राम ताकवले रिसर्च सेंटर, प्रा. बी. आर. कुक्रेती, सरचिटणीस, आयएटीई, कुलसचिव दिलीप भरड, डॉ. संजीवनी महाले, संचालक, शिक्षणशास्त्र विद्याशाखा हे देखील उपस्थित असतील. त्याचप्रमाणे सोमवार, दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी परिषदेच्या समारोप कार्यक्रमास सुरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. के. एम. भांडारकर, निवृत्त प्राचार्य, बी. एड. कॉलेज, नागपूर हे देखील उपस्थित राहणार आहे. सदर परिषदेमध्ये भारतातील नामांकित मान्यवरांची व्याख्याने, पेपर सादरीकरण, परिसंवाद यासारख्या तंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.