अमरावती विद्यापीठात ‘आंबेडकरवादाचे परिप्रेक्ष’ विषयावर राष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय सेमिनारचे आयोजन
डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचा उपक्रम
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने दि. 16 फेब्राुवारी, 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता ‘आंबेडकरवादाचे परिप्रेक्ष’ या विषयावर राष्ट्रीयस्तरावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आय़ोजन डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृह येथे करण्यात आले आहे. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यापीठ, लखनऊ, उत्तरप्रदेशचे प्रो. डॉ. व्हिक्टर बाबू उपस्थित राहतील. प्रमुख वक्ते म्हणून दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय, वानाडोंगरी, नागपूरचे उपकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित राहणार असून बीजभाषण करतील. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर. डी. सिकची व डॉ. प्रविण रघुवंशी उपस्थित राहतील.
प्रथम सत्र ‘आंबेडकरवादाचा इतिहास आणि वर्तमान परिस्थिती’ या विषयावर संपन्न होणार आहे. अध्यक्षस्थान माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. आर. वाघमारे भूषविणार असून रिसोर्स पर्सन्स म्हणून केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक येथील डॉ. सुजाता गौरखेडे व मुंबई विद्यापीठाचे प्रा. संदेश वाघ उपस्थित राहतील. द्वितीय सत्र ‘आंबेडकरवाद आणि भारतीय संविधान’ या विषयावर संपन्न होणार आहे. सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठ अधिसभा व विद्या परिषदेचे सदस्य डॉ. सुभाष गवई भूषविणार असून रिसोर्स पर्सन्स म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. राहुल वरवंटीकर व बहिरजी स्मारक महाविद्यालय, वास्मत, हिंगोलीचे डॉ. बाबूरावजी खंडारे उपस्थित राहतील. तांत्रिक सत्रात पेपर प्रेझेन्टेशन संपन्न होणार असून याप्रसंगी डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे डॉ. वामन गवई व इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नामदेव ढाले यांची उपस्थिती लाभणार आहे.
समारोप सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल नामित विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुंद्रे, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे व वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी उपस्थित राहतील. तरी सदर एकदिवसीय सेमिनारला जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक तथा संयोजक डॉ. संतोष बनसोड यांनी केले आहे. नोंदणीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.