देवगिरी महाविद्यालय व संभाजीनगर शहर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेक्युरिटी जनजागृती कार्यक्रम संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय व संभाजीनगर शहर पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायबर सेक्युरीटी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे यांनी केले. तर अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर होते. सदरील जनजागृती कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक प्रविणा यादव पो. निरीक्षक सायबर गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर या होत्या. आपल्या भाषणामध्ये त्यांनी माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वाकडे मोबाईल, इंटरनेट या सुविधा उपलब्ध झाल्या व समाजमाध्यमांचा उपयोग आज प्रचलित झाला आहे त्यामुळे वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातुन, समाजमाध्यमाद्वारे आपली खाजगी माहिती ही गुन्हेगारांपर्यंत पोहचत असते त्यामुळे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे हे वाढत चाललेले आहेत असे विशद केले.
तसेच आपल्या छायाचित्राचा, वैयक्तीक माहितीचा वापर गुन्हेगार फसवणुकीसाठी, आपल्या बदनामीसाठी, लैगिक शोषणासाठी करु शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या वापर सद्सदविवेक बुध्दी वापरुन केला पाहीजे. आपल्याकडुन समाजमाध्यमावर आक्षेपार्ह वर्तन होणार नाही यांची काळजी घेतली पाहीजे माहिती तंत्रज्ञानाचा दुरुपयोग हा दंडनिय अपराध आहे असे प्रतिपादन श्रीमती प्रविणा यादव यांनी केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, समाजमाध्यम आदीचा वापर मनोरंजनासाठी कमी करावा असे आवाहन केले. माहिती तंत्रज्ञान व समाजमाध्यमाच्या गैरवापरामुळे विद्यार्थी अभ्यास, ग्रंथालय आदीपासुन दुरावत चालला आहे अशी खंत व्यक्त केली. या प्रसंगी मयुर दिवटे सायबर फॉरेन्सिक इन्वेस्टिगेटर, अक्षय जोशी सायबर वॉलेटीअर, आकाश पोहिवाले सायबर वॉलेंटिअर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरीटी, व फॉरेन्सीक सायन्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. अंनत कनगरे, डॉ. भाऊसाहेब शिंदे, डॉ. सुवर्णा पाटील यांची उपस्थिती होती.