देवगिरी महाविद्यालयात विभागीय स्तरावरील गणित चर्चासत्र स्पर्धा संपन्न

छत्रपती संभाजीनगर : गणित विभाग, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटीच्या सहकार्याने 20 वी विभागीय स्तरावरील चर्चासत्र स्पर्धा आयोजित केली होती. सदरील चर्चासत्रचे उद्घाटन डॉ. जगदीश नन्नवरे यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा मॅथेमॅटिकल सोसायटीचे समन्वयक प्रो भाऊसाहेब सोनटक्के हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालय प्राचार्य प्रो अशोक तेजनकर होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख प्राध्यापक मीनाक्षी धुमाळ स्पर्धा संयोजक यांनी केले तर डॉ. जगदीश नन्नवरे व डॉ. भाऊसाहेब सोनटक्के यांनी गणित चर्चा सत्र स्पर्धेसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी गणित क्षेत्रातील संधी तसेच गणित हा अंतरविद्याशाखीय विषय असून विद्यार्थ्यांनी गणित विषयांमध्ये गुणवत्ता संपादन करण्याबरोबरच संशोधन केले पाहिजे असे प्रतिपादन केले. सदरील स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन जिल्ह्यांमधील 34 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

Advertisement
Departmental Level Mathematics Debate Competition Concluded in Devagiri College

विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गणिताची भूमिका, कॉम्प्लेक्स ॲनालिसिस, स्पेस क्राफ्ट मिशनमधील भिन्न समीकरणे, फॉरेन्सिक सायन्स इत्यादी विषय निवडले. सदरील स्पर्धेत स्टीव्हन डिसिल्वा (प्रथम पारितोषिक जेनईसी), किरण सानप (द्वितीय पारितोषिक शासकीय महाविद्यालय), वैष्णवी कायस्थ (तृतीय पारितोषिक देवगिरी महाविद्यालय), दिव्या राऊत (उत्तेजनार्थ पारितोषिक एस बी कॉलेज) उपप्राचर्य डॉ. खैरनार व उपप्राचार्य डॉ.तावरे यांनी विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे मार्गदर्शन करून अभिनंदन केले व विजेत्यांना रोख पारितोषिक स्मृतीचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ. बी. डी डावकर व डॉ. अशोक मुंडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तसेच त्यांनी चर्चासत्र स्पर्धेसाठी निवडलेले विषय विद्यार्थ्यांचे सादरीकरण आदीबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश तेलंग्रे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता मोरखंडीकर, उमेश घारे, अजय घुनावत या प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page