देवगिरी महाविद्यालयात “पायथॉन भाषा व गणित” या विषयावर व्याख्यान संपन्न
गणित आणि पायथॉनच्या अभ्यासामुळे माहिती तंत्रज्ञानामध्ये रोजगार संधी – डॉ. के सी टकले
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयातील गणित विभागातर्फे “पायथॉन भाषा व गणित” या विषयावर डॉ. कल्याणराव टकले (उपप्राचार्य आर एन सी कला जे डी बी वाणिज्य व एन एस सी विज्ञान महाविद्यालय नाशिक) यांचे व्याख्यान प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर तसेच उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, डॉ. अनिल आर्दड व डॉ. अपर्णा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पायथॉन व गणित विषयाची सांगड घालून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करीयरच्या संधी निर्माण करता येतील, त्यासाठी विद्यार्थ्यांनी पायथॉन सारखे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून घेणे आवश्यक आहे. यावेळी गणित विभाग प्रमुख प्रा. मीनाक्षी धुमाळ यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन प्रा. निलेश तेलंग्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संगीता मोरखंडीकर, उमेश घारे व अजय घूनावत यांनी परिश्रम घेतले.