कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर संपन्न
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जी. एस. के. ब्लड सेंटर अँड कॉम्पोनंट्स नागपूरद्वारे आज दि. ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी उपस्थित होते, तसेच मा. कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, रामटेक परिसर संचालक प्रो. हरेकृष्ण अगस्ती, प्रो. पराग जोशी, जी. एस. के. ब्लड सेंटर अँड कॉम्पोनंट्स नागपूर चे संचालक डॉ. आशिष खंडेलवाल व डॉ. श्वेता खंडेलवाल प्रामुख्याने उपस्थित होते. शिबीरामध्ये विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. रक्तदानाकरिता ५० जणांची नावे प्राप्त झाली होती. विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. एकूण ८० जणांनी रक्तदान केले. संस्कृत विषयक तसेच बी.ए. संस्कृत, बीबीए, बीसीए, बीकॉम, बीएड व इत्यादी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
रक्तदान शिबिराचा प्रारंभ सकाळी ११.०० वाजता झाला तसेच सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालले. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता जी. एस. के. ब्लड सेंटर अँड कॉम्पोनंट्स नागपूर चे संचालक, डॉ. आशिष खंडेलवाल यांनी विद्यार्थ्यांना रक्तदाता होण्यासाठी प्रोत्साहन दिले. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले त्यांना विश्वद्यालयातर्फे प्रमाणपत्र तसेच जी. एस. के. ब्लड सेंटर अँड कॉम्पोनंट्स नागपूर यांच्यातर्फे प्रमाणपत्र, उपहार व नाश्ता देण्यात आला होता. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन सहा. प्रा. सीमा गायकवाड (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना), तसेच आभार प्रदर्शन शिबीराचे आयोजक डॉ. जयवन्त चौधरी (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना) यांनी केले. शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. सचिन डावरे, प्रा. मनाली पांडे, प्रा. नितेश चकोले, ऋतिक गायधने यांनी मोलाचे सहकार्य केले.