एमजीएम विद्यापीठात अभिरुप युवा संसदेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि युवक बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात ‘अभिरुप युवा संसद’ स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Advertisement

यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्रीकांत जोशी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे हे तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, प्रा. डॉ. आशा देशपांडे व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण पाच संघांनी आपला सहभाग नोंदविला असून हे संघ दिवसभर आपले सादरीकरण करणार आहेत. विजेत्या संघांना रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *