गोंडवाना विद्यापीठात दोन दिवसीय विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या ४७ व्या वार्षिक अधिवेशनाचे उद्‌घाटन

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी – डॉ. करमसिंग राजपूत

गडचिरोली : शेतीचा कच्चामाल आपण परदेशात निर्यात करतो आणि तिकडचा पक्का माल आपण आपल्या देशात आयात करतो. शेती हमी भावाचा कायदा झाला पाहिजे. माती परीक्षण, बीज प्रक्रिया, शेती पूरक जोडधंदे, पशुधन टिकवले पाहिजे यावर उपाय शोधून आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी. असे मत विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष तसेच विभाग प्रमुख लोकमान्य टिळक महाविद्यालय वाणिज्य वणी करमसिंग राजपूत यांनी व्यक्त केले. विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या ४७ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मागील ७० वर्षाच्या शेती व्यवस्थेवर त्यांनी प्रकाश टाकला आणि सध्या असलेल्या परिस्थितीवर त्यांनी उपाय सुचवले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभाग आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठात आज उद्‌घाटन पार पडले. या परिषदेचे उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, नागपूरचे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र भांडवलकर, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. एच. ए. हुद्दा, उपाध्यक्ष डॉ. राजू श्रीरामे, नागपूर विभागाचे सचिव डॉ. विठ्ठल घिनमिने, अमरावती विभागाचे सचिव डॉ. संजय कोठारी, अर्थमीमांसाचे संपादक डॉ. धीरज कदम, अर्थशास्त्र विभागाच्या समन्वयक डॉ. शिल्पा आठवले आदींची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शोध निबंध जर्नल तसेच अर्थमीमांसा शोधपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

या प्रसंगी मनोगत कार्याध्यक्ष विदर्भ अर्थशास्त्र परिषद डॉ. एच. ए. हुद्दा यांनी केले. प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या वतीने प्रास्ताविक परिषदेचे सचिव डॉ. विठ्ठल घिनमिने यांनी, संचालन स. प्रा. डॉ. सविता सादमवार, आभार समनव्यक डॉ. शिल्पा आठवले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक स. प्रा. डॉ. अनंता गावंडे, डॉ. सुरेखा हजारे, डॉ. महिंद्र वर्धलवार, डॉ. धैर्यशील खामकर आदींनी सहकार्य केले.

Advertisement

या दोन दिवसीय विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा व मंथन होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने नामवंत अर्थतज्ञ तसेच अर्थशास्त्राचे प्राध्यापक विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधी व विद्यार्थी संशोधकांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना संशोधनासाठी प्रेरणा मिळावी व शासनाला आर्थिक नीती तयार करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, अर्थशास्त्र परिषदेची सामान्य जणांना नेहमीच उत्सुकता असते. अर्थशास्त्र हा विषय आपल्या जगण्याचा भाग झालाय. सामान्य
जणांना या परिषदेकडून मूलभूत संशोधनाची अपेक्षा असते. अनेक देशांमध्ये बेरोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. जर्मनी सारख्या देशात काम करण्यायोग्य तरुण कुशल मनुष्यबळाची गरज आहे. युरोपातल्या अनेक देशांमध्ये हीच अवस्था आहे . भारताकडे ४०,०००तरुण कुशल मनुष्य बाळाची मागणी या देशांनी केली .शेतीवर चार महिने काम करणारा मजूर उद्योग धंद्यांमध्ये गेला पाहिजे. याचा विचार विदर्भ अर्थशास्त्र परिषदेने निश्चित केला पाहिजे. नव्या विचारांचे स्मरण विदर्भ अर्थशास्त्र परिषदेला होईल आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल. आणि जगाच्या इतिहासात विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल असे म्हणाले.

ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले
शेतकऱ्यांना बाजारव्यवस्थेमध्ये त्यांच्या पिकाला रास्त किंमत का मिळत नाही, सगळ्यांना रोजगार का देऊ शकत नाही , माणूस महत्त्वाचा की टेकनोलॉजी , जे उत्पादन तयार होते त्याचं योग्य वितरण होतं का असे प्रश्न निर्माण होतात. अशा निर्माण झालेल्या प्रश्नांकडे संशोधन म्हणून पाहणे गरजेचे आहे. आधीच्या तज्ञांनी केलेले संशोधन तुम्ही संदर्भ म्हणून वापरू शकता पण अर्थशास्त्रांचा अभ्यासक , संशोधक म्हणून काही प्रश्नांवर उत्तरे शोधणे आणि मीमांसा करणे ही आपली जबाबदारी आहे. असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

20:12