श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या निवासी शिबिरात जलसाक्षरता याविषयी व्याख्यान संपन्न
सैनिक राष्ट्राचे रक्षण करतात तर आपण राष्ट्राच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करावे – डॉ. सचिन कंदले
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निवासी शिबिर श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणी दुपारच्या बौद्धिक क्षेत्रामध्ये जलसाक्षरता या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.सचिन कंदले यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा दत्ता तोडकर उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. आपण यापूर्वी पाण्याला किती महत्त्व देत होतो पत्रव्यवहार करताना तीर्थरूप असे आई-वडिलांना संबोधित होतो याचा अर्थ असा की पाण्याप्रमाणे पवित्र दुसरे काहीच नाही म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये सोळा संस्कार करत असताना पाण्याचे पूजन केले जाते त्याचे कारणच आहे की पाण्याशिवाय कोणतेही जीवाचे अस्तित्व या पृथ्वीतलावर राहू शकत नाही.
आपल्या नद्यापूर्वी सुंदर स्वच्छ होत्या परंतु आज आपण पाण्यासाठी पाहत आहोत भांडणे युद्ध असे प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी होताना दिसत आहेत म्हणून म्हणून पाणी ही आपली एक राष्ट्रीय संपत्ती आहे. जसे आपल्या सीमेचे रक्षण सैनिक करतात तसेच आपण भारतीय नागरिकांनी युवकांनी आपल्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करून त्याचे संवर्धन रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे म्हणून सर्वांनी आपण दैनंदिन वापरामध्ये असणारे पाणी कमी कसे वापरता येईल त्याचा योग्य वापर कसा करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे म्हणून पावसाच्या पाण्याला आपण जपलं पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी त्याचा संरक्षण करणे हे आजच्या युवा पिढीचे काम आहे. आज आपल्याला देशासाठी मरण्याची गरज नाही तर देशासाठी जगण्याची गरज आहे. आणि जगण्यासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक संसाधने जपण्याची देखील गरज आपल्याला आहे. म्हणून अशा शिबिरामधून युवकांचे प्रबोधन होते ग्रामीण भागामधील युवक जागृत करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना विभाग या निमित्ताने करत असतो पर्यावरण संवर्धन देखील या विभागाने काम केलेले आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक अमर घोडके यांनी केले. तर आभार स्वयंसेवक वैभव घोडके यांनी मानले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाधिकारी डॉ. मनोजकुमार नवसे डॉ. शंकर शिवशेट्टी प्रा. राजाभाऊ नागरगोजे प्रा. रंणजीत आखाडे अर्जुन निंबाळकर, प्रेम माळी व स्वयंसेवक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.