राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे व्यक्तिमत्व विकास केंद्र – डॉ रमेश लांडगे
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर श्री क्षेत्र कपिलधार येथे पर्यावरण व व्यक्तिमत्व विकास या विषयावर दुपारच्या बौद्धिक क्षेत्रामध्ये व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रमेश लांडगे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. दिलीप जरे हे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते यांनी मत व्यक्त करताना म्हणाले की आजच्या युवकांचा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून केले जात आहे यामध्ये स्वयंसेवकांना संस्काराचे धडे देणे तसेच समाजाप्रती काहीतरी आपण देणं लागतो याची जाणीव अशा शिबिरामधून केली जाते. युवकांनी आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता ओळखून आपल्या व्यक्तित्वाचा विकास करावा, आपली स्वतंत्र विचारधारा असावी, आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत हे व्यक्तित्वाची ओळख आहे. स्वतःला जाणून घ्या. आपले स्वतःचे एक स्वतंत्र मत असू द्या.
आपले देहबोली व्यवस्थित असू द्या नेहमी सकारात्मक विचार करा आपल्याला जे काही व्यक्त करायचे आहे किंवा प्रतिनिधित्व करायचे अशा प्रसंगी आपली भूमिका योग्य असावी तसेच आपल्या जीवनामध्ये छंद जोपासले पाहिजे. आज आपण पाहत आहोत युवक समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्यांवर काम करत आहे त्यातून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. अनेक कार्यकर्ते समाजामधील समस्या शोधून त्यावर त्यावर उपाययोजना करीत आहेत. आज आपण पाहत आहोत पाणी पर्यावरण जल, जंगल, जमीन, वन या क्षेत्राची अत्यंत हानी झालेले आहे म्हणून युवकांनी या पर्यावरणीय समस्या कडे गांभीर्याने लक्ष देऊन कृती केली पाहिजे. तीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असली पाहिजे आणि त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनीही स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक वैभव सदरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वयंसेवक अमर घोडके यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ मनोजकुमार नवसे डॉ. प्रकाश कोंका डॉ. शंकर शिवशेट्टे प्रा. राजाभाऊ नागरगोजे, प्रा. रंणजीत आखाडे प्रा विवेक वैद्य प्रा हांगे सर प्रा दत्ता तोडकर प्राध्यापिका वर्षाताई भोसले प्राध्यापिका डॉ नीता बावणे डॉ दीपमाला माने तसेच बहुसंख्य स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.