‘स्वारातीम’ विद्यापीठातील दत्तात्रय पाटील सेवानिवृत्त
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षारक्षक दत्तात्रय पाटील हे कर्मचारी दि. ३१ जानेवारी रोजी नियतवयोमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी सेवानिवृत्त सत्कारमूर्तींचे शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सकुटुंब सत्कार केला. विद्यापीठातील सुरक्षारक्षक कर्मचारी दत्तात्रय पाटील यांनी विद्यापीठाला एकूण १९ वर्ष सेवा दिली आहे.
आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी या कर्मचाऱ्यास त्यांनी विद्यापीठास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल कौतुक केले. आणि पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमय लाभो अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, उपकुलसचिव रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनीही दत्तात्रय पाटील यांना पुढील जीवन सुखीं, समृद्धी व आरोग्यमयासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदिश कुलकर्णी यांनी केले.