गोंडवाना विद्यापीठात दोन दिवसीय विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन
विदर्भातील अर्थतज्ज्ञ परिषदेत होणार सहभागी
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या पदव्युत्तर शैक्षणिक उपयोजित अर्थशास्त्र विभाग आणि विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात शनिवार दि. ३ व रविवार दि. ४ फेब्रुवारी दरम्यान विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या ४७ व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर परिषदेचे अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. करमसिंग राजपूत उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन वने, मत्स्य व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, खासदार अशोक नेते. गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे व विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, नागपूरचे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र भांडवलकर, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. एच. ए. हुद्दा, उपाध्यक्ष डॉ. राजू श्रीरामे, नागपूर विभागाचे सचिव डॉ. विठ्ठल घिनमिने, अमरावती विभागाचे सचिव डॉ. संजय कोठारी, अर्थमीमांसाचे संपादक डॉ. धीरज कदम उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवशीय विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा व मंथन होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने नामवंत अर्थतज्ञ तसेच अर्थशास्त्राचे प्राध्यापक विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन करणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधी व विद्यार्थी संशोधकांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, त्यांना संशोधनासाठी प्रेरणा मिळावी व शासनाला आर्थिक नीती तयार करण्यास मदत व्हावी, या उद्देशाने अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनाचा समारोप रविवार, दि.४ फेब्रुवारीला अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी परिषदेचे अध्यक्ष लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. करमसिंग राजपूत, जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. जे. एम. काकडे, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. एच. ए. हुद्दा, उपाध्यक्ष डॉ. राजू श्रीरामे, नागपूर विभागाचे सचिव डॉ. विठ्ठल घिनमिने, अमरावती विभागाचे सचिव डॉ. संजय कोठारी, अर्थमीमांसाचे संपादक डॉ. धीरज कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय अर्थशास्त्र परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, समन्वयक डॉ. शिल्पा आठवले, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंता गावंडे, डॉ. सुरेखा हजारे, डॉ, महिंद्र वर्धलवार, डॉ. धैर्यशील खामकर आदींनी केले आहे.
या विषयांवर होईल चर्चासत्र
उद्घाटनंतर
दुपारी : ०२.०० ते ०३.०० या वेळेत पहिले चर्चासत्र
विकास सिद्धांताचे बदलते स्वरूप
दुसरे चर्चासत्र ३.३० ते ५.००
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे आर्थिक आणि सामाजिक
क्षेत्रातील योगदान
सांयकाळी ०५.३० ते ६.३०
प्रा. नाणेकर व प्रा. पिंपरकर स्मृती व्याख्यान
शास्वत विकास आणि ग्रामसभा
वक्ते ,जेष्ठ समाजसेवक, लेखा मेंढा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, वक्ते डॉ. देवाजी तोफा
रविवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४
सकाळी ०९.३० ते १०.३० या वेळेत
विशेष व्याख्यान- आर्थिक ग्रंथातील विचारविश्व
विषय : प्रॉब्लेम ऑफ रुपी
वक्ते प्राचार्य, कै. नारायण अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय, चांदुरबाजार, जि. अमरावती, डॉ. वनिता चोरे,
तिसरे चर्चासत्र
सकाळी १०.३० ते ११.३०
विषय : विदर्भातील औद्योगिक विकास (जिल्हा निहाय)