शिवाजी विद्यापीठाच्या महिला रग्बी संघाची खेलो इंडिया साठी निवड

कोल्हापूर : चंदीगढ विद्यापीठ मोहाली (पंजाब) या ठिकाणी संपन्न झालेल्या २०२३/२४ या वर्षातील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये देशभरातून 48 विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये आपल्या विद्यापीठाच्या महिला संघाने अतिउच्च कामगिरी करत 7SIDE प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. तसेच 15SIDE प्रकारामध्ये रजत पदक पटकावले. आणि संघाची खेलो इंडिया साठी निवड करण्यात आली.

Advertisement
Shivaji University Women's Rugby Team Selection for Khelo India

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या महिला संघाच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी टी शिर्के यांच्या हस्ते या सर्व खेळाडूंचे कौतुक करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पी एस पाटिल , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.अमर सासने, प्रशिक्षक दीपक पाटील, प्रा.राहुल लहाने व संघ व्यवस्थापक प्रा. संग्रामसिंह मोरे, सूचय खोपडे उपस्थित होते. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर महिला रब्बी संघातील खेळाडू शुभांगी गावडे, कल्याणी पाटील, वैष्णवी पाटील, पूजा कुंभार, शितल शिनगारे, पूनम पाटील, साक्षी कुंभार, स्वाती माळी, नेहा पाटील, प्राची पारखे, सानिका पाटील, साक्षी चौगुले, वसुधा माळी, पल्लवी डवर, वैष्णवी सरनोबत, कार्तिकी पाटील हे शिवाजी विद्यापीठातील खेळाडू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page