संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे उद्घाटन
शारीरिक शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करावा – पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी
विद्यार्थ्यांनी आपली क्षमता वाढवावी – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
अमरावती : शारीरिक शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करावा, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्यावतीने विद्यापीठातील कर्मचा-यांसाठी आयोजित शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे उद्घाटन नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिराची आवश्यकता आहे व विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभाग महत्वाचा आहे, असे सांगून शारीरिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी आपली क्षमता वाढवावी, असे आवाहन केले. तर या शिबिराबद्दलची माहिती विभागप्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी दिली. तसेच सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. संचालन आदेश रक्षे, तर आभार समा लीवा यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. सविता केने, सविता बावनथडे, डॉ. अतुल बिजवे, डॉ. विजय निमकर, निलेश इंगोले, सौरभ त्रिपाठी, विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.