श्री बंकटस्वामी महाविद्यालयात निवडणूक साक्षरता क्लब ची स्थापना
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित निवडणूक साक्षरता क्लब कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून तुकाराम जाधव ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तसेच त्यांचे सहकारी संतोष गायकवाड निवडणूक विभाग बीड तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी निवडणूक साक्षरता क्लबच्या बोर्डचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या क्लबच्या माध्यमातून ज्या युवकांचे युवतींचे वय वर्ष 18 पूर्ण होईल त्यांचे नाव नोंदणी मतदार यादी मध्ये करणे तसेच महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यानसाठी जनजागृती पर कार्यक्रम घेणे,निपक्षपाती निवडणूक होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे,कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता लोकशाही पद्धतीने आपला मतदानाचा हक्क वापरण्याच्या बाबतीत जागृती निर्माण करणे. एक सुदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी हे अभियान कार्यरत असणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक तुकाराम जाधव ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी या प्रसंगी त्यांनी निवडणूक साक्षरता मंडळाच्या कार्यपद्धती विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ महाविद्यालयाचे निवडणूक साक्षरता क्लबचे नोडल अधिकारी डॉ मनोजकुमार नवसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कनिष्ठ विभागाचे निवडणूक साक्षरता मंडळ क्लबचे प्रमुख प्रा.रमेश वळवी यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.