एमजीएममध्ये उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिन

छत्रपती संभाजीनगर : भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन महात्मा गांधी मिशनच्यावतीने एमजीएम स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी वैद्यकीय शिक्षणसंस्था, सेवाग्राम मेडिसीन विभागाचे संचालक डॉ. उल्हास जाजू यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. जाजू यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Republic Day was celebrated in a spirited atmosphere at MGM

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेल्या १७ जागतिक उद्दिष्टांचे देखावे आणि पथसंचलन आदी कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. पथ संचलनातील उत्कृष्ट पथक आणि सर्वोत्तम देखाव्याचे सादरीकरण करणाऱ्या महाविद्यालयाच्या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास कुलपती अंकुशराव कदम, अनुराधाताई कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

Republic Day was celebrated in a spirited atmosphere at MGM

फर्स्ट स्टेप स्कूलचे न्यूजलेटर आणि एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनच्या एमजीएम इन्सपायरचे मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. यावेळी देशभक्तिपर गीते व वृंदगान फर्स्ट स्टेप स्कूल शाळेतील विद्यार्थी आणि गायक राहुल खरे व भक्ती बनवस्कर यांच्या टीम यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृषीकेश मोरे आणि गौरी जोशी यांनी केले. आज झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्राचार्य प्रतापराव बोरांडे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ८८ वर्षीय लाला चव्हाण यांनी विशेष गाडीच्या सहाय्याने मैदानावर प्रात्यक्षिके करून दाखवली. एमजीएम विद्यापीठ गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Republic Day was celebrated in a spirited atmosphere at MGM

संयुक्त राष्ट्राने निर्धारित केलेले १७ जागतिक उद्दिष्टे ही ‘वैश्विक उद्दिष्टे’ किंवा ‘निरंतर विकास उद्दिष्टे’ म्हणूनही ओळखली जातात. ही व्यापक ध्येये एकमेकांशी निगडित आहेत; परंतु प्रत्येक उद्दिष्टाच्या प्राप्तीचे स्वतःचे लक्ष्य आहेत. सर्व उद्दिष्टांचे एकूण १६९ लक्ष्ये आहेत. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. यात गरीबी, उपासमार, आरोग्य, शिक्षण, हवामानातील बदल, लिंग समानता, पाणी, स्वच्छता, ऊर्जा, पर्यावरण आणि सामाजिक न्याय इत्यादींचा समावेश आहे. या उद्दिष्टांची प्राप्ती वर्ष २०३० पर्यंत करायचे ठरविले गेले आहे. आज या १७ उद्दिष्टांवर आधारित देखावे एमजीएमच्या विविध महाविद्यालय/संस्थांनी यावेळी सादर केली.

उद्दिष्टे आणि देखावा सादरीकरण केलेल्या महाविद्यालय/संस्थेची माहिती खालीलप्रमाणे आहे.

१.      गरीबी नष्ट करणे : जगातील सर्व प्रकारचे दारिद्र्य नष्ट करणे.

संस्था : एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

२.      शून्य उपासमार : उपासमार संपुष्टात आणणे, खाद्यान्न सुरक्षा व सुधारित पोषण प्राप्त करणे आणि शाश्वत शेतीचा प्रसार करणे.

संस्था : एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट

३.      आरोग्य व लोक कल्याण : सर्व वयोगटातील सर्वांसाठी निरोगी आयुष्य व लोक कल्याण सुनिश्चित करणे.

संस्था : एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन

४.      गुणवत्ता शिक्षण : सर्वसमावेशक आणि न्याय्य दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी जगभर शिकण्याच्या संधींना उत्तेजन देणे.

संस्था : एमजीएम स्कूल्स

५.      स्त्री-पुरुष समानता : सर्व महिला व मुलींना लैंगिक समानता प्राप्त करवून देणे आणि त्यांस सक्षम करणे.

संस्था : एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन

६.      पाणी आणि स्वच्छता : सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेची उपलब्धता करून स्थायी व्यवस्थापनाची खात्री करणे.

संस्था : एमजीएम मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग

Advertisement

७.      सुलभ आणि स्वच्छ ऊर्जा : सर्वांसाठी स्वस्त, विश्वसनीय, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जास्रोतापर्यंत प्रवेश निश्चित करणे.

संस्था : एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनियरिंग कॉलेज

८.      सभ्य रोजगार आणि आर्थिक वाढ : निरंतर, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणे. उत्पादक आणि पूर्ण रोजगाराच्या संधी सर्वांना पुरविणे.

संस्था : एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च

९.      उद्योग, नवीन उपक्रम आणि पायाभूत सुविधा : संवेदनक्षम पायाभूत सुविधा, समावेशक व शाश्वत औद्योगिकीकरण आणि नावीन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देणे व वाढविणे.

संस्था : एमजीएम डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस

१०.  आर्थिक असमानता : देशातील उत्पन्न किंवा आर्थिक असमानता कमी करणे.

संस्था : एमजीएम स्कूल ऑफ इंटरडिसीप्लीनरी स्टडीज

११.  शाश्वत शहरे आणि समुदाय : शहरे आणि मानवी वस्तीला समावेशक, सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत बनविणे.

संस्था : एमजीएम मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल

१२.  जबाबदार आणि उत्पादन : शाश्वत उपभोग आणि उत्पादन प्रक्रियेची खात्री करणे.

संस्था : एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी  

१३.  हवामान क्रिया : वातावरणातील बदल व त्याच्या उत्पत्तीवरील नियंत्रणासाठी उत्सर्जनाचे नियमन त्वरित कारवाई करून करणे आणि अक्षय ऊर्जेच्या विकासास प्रोत्साहन देणे.

संस्था : एमजीएम लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाइन

१४.  पाण्याखालील जीवन : शाश्वत विकासाकरिता महासागर, समुद्र आणि समुद्री संसाधनांचा संरक्षित आणि सातत्यपूर्ण वापर करणे.

संस्था : डॉ.जी. वाय. पाथ्रीकर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय. टी.

१५.  जमिनीवरील जीवन : स्थूल पर्यावरणातील शाश्वत उपयोगांचे संरक्षण करणे, त्यांचे पुनरुज्जीवन करणे, जंगलांचे व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरण थांबिवणे आणि जैवविविधता संरक्षित करणे.

संस्था : एमजीएम कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर गांधेली

१६.  शांती, न्याय आणि मजबूत संस्था : शाश्वत विकासाकरिता शांतीपूर्ण आणि समावेशक समाज निर्माण करणे. सर्वांसाठी न्याय मिळविणे आणि यासाठी सर्व स्तरांवर प्रभावी, उत्तरदायी आणि समावेशी संस्था निर्माण करणे.

संस्था : एमजीएम स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च

१७.  लक्ष्यांसाठी भागीदारी : अंमलबजावणीची साधने बळकट करणे आणि सातत्यपूर्ण विकासासाठी जागतिक भागीदारी प्रोत्साहित करणे.

संस्था : एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी

पारितोषिक विजेत्या संघांची नावे खालीलप्रमाणे असून या पथसंचलन आणि देखाव्याचे परीक्षण डॉ. एच. आर.राघवन, बसंत यादव आणि डॉ. रचना सपकाळ यांनी केले.

एनसीसी पथ संचलनातील उत्कृष्ट पथक :

प्रथम क्रमांक : प्रतीक पवार, जवाहरलाल नेहरू इंजिनियरिंग कॉलेज

द्वितीय क्रमांक : मधुरा, ज्ञानेश, रोहित, एमकेडीईआय, पडेगाव

तृतीय क्रमांक : बबन दळवी, डॉ.जी. वाय. पाथ्रीकर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय. टी.

पथसंचलन पुरूष गट

प्रथम क्रमांक : यश मालवदकर, क्लोव्हर डेल स्कूल 

द्वितीय क्रमांक : शिवराज निकम, जवाहरलाल नेहरू इंजिनियरिंग कॉलेज

तृतीय क्रमांक : अभिर धरवडकर, स्कूल ऑफ फिजिओथेरपी

पथसंचलन महिला गट

प्रथम क्रमांक :  निरल जैसवाल, क्लोव्हर डेल स्कूल 

द्वितीय क्रमांक : ब्रम्हा भोसले, संस्कार विद्यालय

तृतीय क्रमांक : प्रेरणा रगडे, जिएनएम  

पथसंचलन उत्कृष्ट ट्रूप कमांडर  : आकाश मुंडे, डॉ.जी. वाय. पाथ्रीकर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आय. टी.

पथसंचलन उत्कृष्ट पाईप बॅन्ड : श्रावणी, संस्कार विद्यालय

उत्कृष्ट देखावा पारितोषिक

प्रथम क्रमांक : एमजीएम कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन

द्वितीय क्रमांक : एमजीएम स्कूल्स

तृतीय क्रमांक : एमजीएम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च

उत्तेजनार्थ पारितोषिक

१.      सूरज जाधव, इंस्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चर, गांधेली

२.      एमजीएम स्कूल्स

३.      एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page