नालंदा बी. सी. ए. महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
छत्रपती संभाजीनगर : नालंदा बी. सी. ए. महाविद्यालय एन-११ हडको या महाविद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य राहूल म्हस्के हे होते. प्राचार्य राहूल म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक कॅटन विजय जाधव व माजी मेजर किशोर राऊत हे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य राहूल म्हस्के सर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक सुभेच्छा दिल्या. संविधानाने जनतेला विशेष अधिकार दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर सर्वांनी चालावे या विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थीनी प्राजक्ता ढेकळे प्रजासत्ताक दिनानिमित्त काव्य वाचन केले. या कार्यक्रामचे सुत्रसंचालन प्रा. योगेश सिरसाठ यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. शुभांगी गायकवाड यांनी केले. प्रा. कोमल जेधर, प्रा. शुभांगी विधाटे, पुजा पगारे, अनिल साळवे, संजय बनकर, सिताराम महाजन, मिजारोद्यीन सय्यद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.