मिल्लीया महाविद्यालयात “जीवन विज्ञानातील करिअर मार्ग“ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न

बीड : येथील मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूरकासार, दादापाटील राजळे महाविद्यालय, आदिनाथनगर (पाथर्डी), कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, महाराज जे.पी. वळवी महाविद्यालय, धडगाव (नंदुरबार) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी प्राणीशास्त्र विभागाने आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जीवन विज्ञानातील करिअर मार्ग (करिअर अवेणूस इन लाईफ सायन्सेस Career Avenues in life Sciences) या विषयावर राष्ट्रीय वेबिनार संपन्न झाला. या वेबिनारसाठी उद्घाटक म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्र- कुलगुरु डॉ. लक्ष्मीकांत दामा तर मार्गदर्शक म्हणून डॉ. अरुण प्रताप सिकरवार (दयालबघ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, आग्रा) व डॉ. अनिल कुरे (पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी) हे उपस्थित होते. प्रथम सत्रात स्पर्धा परीक्षेकरिता लाईफ सायन्स या विषयावर दयालबाग शैक्षणिक संस्था, आग्रा (स्वायत विद्यापीठ) येथील प्रा. डॉ. अरुण प्रताप सिकरवार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात लाईफ सायन्स मधील व्यावसायिक संधी या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध संशोधन संस्थांमधून आवश्यक असणाऱ्या संशोधक व्यावसायिकांची पात्रता व त्यासाठीचा अभ्यास याबद्दल पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय, प्रवरानगर, लोणी (अहमदनगर) येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल कुरे यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement
National Webinar on ``Career Avenues in life Sciences'' held at Millia College

या राष्ट्रीय वेबिनारसाठी मुख्य संयोजन सचिव म्हणून मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय बीडचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलियास फाजील, कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूर कासारचे प्राचार्य डॉ. विश्वास खंदारे, दादापाटील राजळे महाविद्यालय, आदिनाथनगर (पाथर्डी) प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व महाराज जे. पी. वळवी महाविद्यालय,धडगावचे (नंदुरबार) प्राचार्य डॉ. संजय गायकवाड होते. राष्ट्रीय वेबिनारचे निमंत्रक डॉ. सायरी अब्दुल्ला, डॉ. तन्वीर पठाण, डॉ. संतोष रणखांब, डॉ. ए. आर. चौरपागर व डॉ. एस. इ शिंदे हे होते. राष्ट्रीय वेबिनार चे सूत्रसंचालन डॉ. अतुल चौरपगार यानी तर आभार डॉ. सुनिल शिंदे यांनी व्यक्त केले. या राष्ट्रीय वेबिनारसाठी देशाच्या विविध राज्यांमधून 387 प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page