शिवाजी विद्यापीठात ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ पथनाटयाव्दारे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : राष्ट्रीय बालिका दिन निमित्त बुधवार दि. 24 जानेवारी, 2024 रोजी बेटी बचाओ अभियान, विद्यार्थी विकास विभाग, समाजशास्त्र अधिविभाग आणि सरदार रामचंद्र बाडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, पुनाळ, ता. पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या विषयावर पथनाटय सादरीकरण शिवाजी विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आणि मानव्यविद्या इमारतीसमोर तसेच बस स्टॅंड, बिंदू चैक आणि भवानी मंडप या ठिकाणी हा जनजागृती कार्यक्रम पथनाटयाव्दारे घेण्यात आला.

Advertisement
public awareness program in suk through 'Save girl child, Teach girl child' street play

यावेळी सायली कांबळे, रेणू कांबळे, मयुरी निर्मळ, श्रावणी भोई, राजश्री झुटाळ, बानू मुल्ला, स्नेहल चाळके, सानिका कांबळे यांनी पथनाटय सादर केले. त्याचबरोबर समन्वयक जीवनप्रकाश माळवी, श्रीधर बाडे, प्राजक्ता साळोंखे, विशाल ढाकवे, गणेश हसबे, पवन कांबळे, विष्णु कांबळे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page