शाश्वततेच्या कल्पनांचे प्रशिक्षण आणि आकलन होणे गरजेचे – प्रा. एम. एम. साळुंखे
मुलभूत शिक्षण हेच भविष्य आहे – प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : चांगले भविष्य शोधणे ही काळाची गरज असे प्रतिपादन प्रा. एम. एम. साळुंखे, शिवाजी विद्यापिठासहीत अन्य चार विद्यापीठांचे माजी कुलगुरू यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात आयोजित अशक्यतेच्या स्वयंसिद्धतेला आव्हान द्या या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रा. एम. एम. साळुंखे यांचा परिचय अधिविभागप्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी करून दिला. तसेच त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार ही करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. साळुंखे यांनी अदृश्य तंत्रज्ञानामागचे विज्ञान सोप्या भाषेत सांगितले. “त्यांना माहित नव्हते की हे अशक्य आहे, म्हणून त्यांनी ते केले” हा मार्क ट्वेन यांचा तसेच “जिथे मार्ग नेईल तिथे जाऊ नका, त्याऐवजी जा जिथे रस्ता नाही” असे प्रेरणादायी विचार मांडले. भारताची ताकद लोकशाही व विविधतेमध्ये एकता यामध्ये कशी आहे या विषयी चर्चा केली. महात्मा गांधी यांची शांतता, सहिष्णुतेची परंपरा यावर आपले विचार मांडले. जगातील सर्वात मोठी बँडविड्थ क्षमता व पायाभूत सुविधा भारतामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्वाधिक इंग्रजी बोलणारी लोकसंख्या विरुद्ध बहुसंख्य निरक्षर. ते पुढे म्हणाले की मानव संसाधन, ज्ञानाचा अखंड दृष्टीकोन आणि नवकल्पनांचे शाश्वत चक्र या मानवी जीवनात महत्वाच्या बाबी आहेत. स्पर्धात्मक जगात ज्ञान निर्मिती आणि नावीन्यता महत्वाची आहे.
वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत आहे. नेहरू व टागोर यांच्या वैज्ञानिक, सार्वत्रिकता व जागतिकीकरण यांविषयीचे विचार मांडले. युनायटेड नेशन्स ने दिलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांची पूर्तता करण्यात युवकांची भूमिका स्पष्ठ केली. भारताने या शाश्वत विकास उद्दिष्टांची भविष्यवाणी फार पूर्वीपासून केली होती ज्यात भगवान बुद्ध आणि गांधीजी यांचा समावेश होता. नवीन शिकण्याची प्रतिमान – शिस्तबद्ध फ्लेवर्सचे मिश्रण फ्लेक्सी-लर्निंग-स्विच करण्यासाठी पर्याय, डिजिटल शिक्षण यांविषयी चर्चा झाली. पृथ्वीवरील संसाधनांचे अनियंत्रित शोषण यावर भाष्य केले. ज्ञानाशिवाय कोणतीही समस्या सतत विचारांच्या हल्ल्याला तोंड देऊ शकत नाही. त्यांनी डॉ. होमी भाभा आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासह अनेक प्रख्यात शास्त्रज्ञ आणि त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता उद्धृत केली, त्यांनी आपल्या प्राचीन विचारवंत आणि तत्त्वज्ञांची अनेक उदाहरणे सादर केली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याचे सुचविले. सर्जनशील व्यक्तींची उदाहरणे दिली त्यामध्ये होमी जहांगीर भाभा, डी. डी. कोसंबी, लिओनार्डो डी विंची, हॅरोल्ड वर्मस, पॉल क्रुत्झेन. सर्व ऐतिहासिक अनुभवामध्ये या सत्याची पुष्टी होते की जोपर्यंत मनुष्य वेळोवेळी ध्येय गाठत नाही तोपर्यंत तो शक्य होणार नाही असे वाटते. त्यांनतर प्रश्नोत्तरे चर्चा झाली त्यामध्ये उत्स्फूर्तपणे अनेकांनी भाग घेतला.
डॉ. ए. आर. पाटील यांनी व्याख्यान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून आभार मानले. सिद्धी पाटील या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनीने या कार्यक्रमाचे कुशलतेने सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रा. के. वाय. राजपुरे, प्रा. एम. व्ही. टाकळे, डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. टी. डी. डोंगळे, डॉ. एच. एम. यादव, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. यु. एम. चौगुले, डॉ. एस. पी. दास, डॉ. एस. एस. पाटील, श्री. एन. के. चव्हाण, यांच्यासह विभागांतील विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू मा. पी. एस. पाटील आणि कुलसचिव मा. व्ही. एन. शिंदे यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य होत आहे असे भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी सांगितले. विभागप्रमुख झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी विविध व्याख्याने आयोजित केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी प्रा. आर. जी. सोनकवडे यांचे आभार मानले.