श्री बंकटस्वामी महाविद्यालयात ”कोविड-19 काळा नंतरचे समाजातील आव्हान” या विषयावर व्याख्यान संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभागाअंतर्गत कोविड 19 काळा नंतरचे समाजातील आव्हाने या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते बलभीम महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. गोविंद बावस्कर हे होते. डॉ. गोविंद बावस्कर सर यांनी कोविड काळानंतर जग हे पूर्ण ऑनलाईन झाले आहे आणि त्यामुळे त्याचा या समाज व्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे लिंग भेदाची परंपरा जागतिक स्तरावर कायम ठेवण्यात आली कोरोना काळाचा प्रभाव सामाजिक, आर्थिक ,कौटुंबिक इत्यादी घटकांवर झालेला आहे आणि त्यामुळे या समाज व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारची आव्हाने निर्माण झालेली आहेत. शैक्षणिक घटकावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सवय लागली आहे.
कौटुंबिक घटकांमध्ये ज्या मेट्रो सिटीज आहेत त्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती होती एकाच घरातील सर्व व्यक्ती नोकरी निमित्त बाहेर जात असल्यामुळे वादविवाद फारसे होत नव्हते परंतु कोव्हिड काळात सर्वजण एकाच ठिकाणी राहिल्यामुळे कौटुंबिक वाद विवादाला सुरुवात झाली आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये जवळपास 30टक्के एवढी वाढ या कोरोना काळात झालेली आहे आर्थिक घटकांमध्ये मोठ्या उद्योगांसोबतच लघु उद्योगांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि सामान्य माणसाला चरितार्थ चालू नये अवघड होऊन बसले रोजंदारीचा आलेख खूप कमी झाला. अशा अनेक आव्हानांचा सामना या समाज व्यवस्थेला आज करावा लागत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निता बावणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कुंडलिक खेत्रे सर यांनी व्यक्त केले.