देवगिरी महाविद्यलयाच्या समाजशास्त्र विभागाचे दोन विदयार्थी ‘नेट’परीक्षा उत्तीर्ण
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्थात ‘नेट’ मध्ये यश मिळविले आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या या चाचणीचा निकाल गुरुवारी घोषित करण्यात आला आहे. प्रियंका केदार नजन (‘नेट’,जे.आर.एफ),पदासाठीच्या परीक्षेत यशस्वी झाली आहे, तर सुयोग जोशी सहायक प्राध्यापक पदासाठीच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. समाजशास्त्र विभागांतर्गत नेट, सेट, जे. आर. एफ. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यंत चांगले असून विभागातील ६० पेक्षा अधिक विद्यार्थी विविध विद्यापीठ व महाविद्यालया अंतर्गत प्राध्यापक महणून महाराष्ट्रभर काम करीत आहे त्याचबरोबर विभागातील संशोधन केद्राअतर्गत ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पीचडी प्राप्त केली असून ५० पेक्षा ग्रंथाचे लेखन विभागातील प्राध्यापकानी केले आहे.
पदवी व पद्युत्तर स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान अनेकदा प्राप्त झाला आहे .विभागातील प्राध्यापकाच्या अथक प्रयात्नामुळे विद्यार्थांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविले असून अशा विद्यार्थाचा सत्कार करून इतर विद्यार्थांना प्रोसाहन मिळावे हि यामागे भूमिका असते, त्यामुळेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य आणि समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलीप खैरनार यांच्या हस्ते यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.