इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे जानेवारी 2024 सत्राचे प्रवेश सुरु
छत्रपती संभाजीनगर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली , (UGC NAAC A++ प्राप्त मुक्त विद्यापीठ ) प्रादेशिक केंद्र पुणे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातील इग्नू (IGNOU) अभ्यासकेंद्र 1610 मध्ये जानेवारी 2024 सञाचे वेगवेगळ्या इग्नूच्या अभ्यासक्रमांना 31 जानेवारी 2024 पर्यंत (www.ignou.ac.in) प्रवेश चालू आहेत. तसेच द्वितीय व तृतीय वर्षासाठी रिरजिस्ट्रेशन 29 जानेवारी 2024 पर्यंत चालू आहेत. इग्नू फ्रेश प्रवेशासाठी व रिरजिस्ट्रेशन साठी (ODL Mode)l- ignouadmission.samarth.edu.in ह्या लिंकचा वापर करावा. विशेष आनंदाची बाब म्हणजे जुलै २०२3 सत्रापासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाकडून नव्याने करण्यात आलेल्या तरतुदीनुसार इग्नूमध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कोर्सेसना प्रवेश घेता येईल. तसेच SC / ST संवर्गातील विद्यार्थ्यांना Degree level, Certificate and Post Graduate Diploma Programmes ला मोफत प्रवेश देण्यात येत आहेत.
इग्नू प्रवेशांमध्ये पदवी स्तरावर वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये बीसीए, बीए, बी कॉम , बी एस डब्ल्यू, मास्टर्स डिग्री प्रोग्राम्स मध्ये पदव्युत्तर स्तरावर एम. ए. इंग्लिश, हिंदी, एमएस डब्ल्यू, मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, हिंदी, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, कॉमर्स, रूरल डेव्हलपमेंट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स मध्ये ट्रान्सलेशन, गांधी आणि पीस स्टडीज, रूरल डेव्हलपमेंट, जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, उच्चशिक्षण, डिझास्टर मॅनेजमेंट, बुक पब्लिशिंग, टुरिझम , क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश अशा वेगवेगळ्या कोर्सेसना 30 जुन 202 पर्यंत प्रवेश चालू आहेत. तसेच ह्या शेक्षणिक सत्रापासून 6 PGDs प्रोग्राम्स सुरून केले आहेत, आधिक माहितीसाठी ignou.ac.in वर Common Prospectus २०२३ ला भेट द्यावी. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली, प्रादेशिक केंद्र पुणे अंतर्गत चालणाऱ्या जुलै २०२३ सत्रासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी व आधिक माहितीसाठी विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील इग्नू स्टडी सेंटर 1610 विवेकानंद महाविद्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये (मंगळवार ते शनिवार 4 ते 7 , रविवार 10.30 ते 1.30, Phone No. 0240-2365871) संपर्क साधण्याचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे व इग्नू समन्वयक, डॉ. नागनाथ तोटावाड अभ्यास केंद्र १६१० यांनी केले आहे.