‘दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन’ संस्थेने दिले आरोग्य, शिक्षण व रोजगारही – आ. डॉ. आंबटकर
सावंगी मेघे रुग्णालयाच्या महाशिबिरात २,५६६ रुग्णांची तपासणी
वर्धा : कोणत्याही परिसरात मोठी संस्था उभी झाली की विकासाला चालना मिळते. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेने आरोग्यसेवेसोबतच उच्च शिक्षण आणि रोजगाराचीही सुविधा विदर्भात उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांनी लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात आरोग्य संकल्प अभियानांतर्गत आयोजित महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. या शिबिरात २ हजार ५६६ नागरिकांनी मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, ,
वर्धा : कोणत्याही परिसरात मोठी संस्था उभी झाली की विकासाला चालना मिळते. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेने आरोग्यसेवेसोबतच उच्च शिक्षण आणि रोजगाराचीही सुविधा विदर्भात उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांनी लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात आरोग्य संकल्प अभियानांतर्गत आयोजित महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले. या शिबिरात २ हजार ५६६ नागरिकांनी मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे वर्धा सोशल फोरम आणि लोक महाविद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित या मोफत आरोग्यसेवा महाशिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. आंबटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळीच्या माजी नगराध्यक्ष शोभा तडस होत्या. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, पुलगाव येथील सीएडी कॅम्पचे ब्रिगेडियर कौशलेष पांघाल, अभिमत विद्यापीठाचे महासंचालक डॉ. राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, महामंत्री जयंत कावळे, लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्यासह ज्येष्ठ कामगार नेते कॉ. यशवंत झाडे, माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, बंटी गोसावी, माजी सभापती निलेश किटे, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय गायधने, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, शरद पवार दंत महाविद्यालयाच्या संचालक मनीषा मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, लोक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव जाधव, वर्धा सोशल फोरमचे अविनाश सातव, माजी नगर सेवक प्रशांत बुर्ले, सतीश वैद्य, कैलाश राकडे, श्रेया देशमुख, गुंजन मिसाळ, वंदना भुते, रंजना पट्टेवार, निलेश पोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपूर आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यात उच्च शिक्षण आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात मेघे समूह अग्रेसर असून कोरोना काळात मध्यभारतातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत नवजीवन देण्याचे मोलाचे कार्य सावंगी मेघे रुग्णालयाने केले, असे गौरवोद्गार आ. डॉ. पंकज भोयर यांनी काढले. केंद्रीय दारुगोळा भांडार सांभाळणारा सीएडी कॅम्प हा आमचा छोटासा परिवार विदर्भात पसरलेला असून या परिवाराच्या आरोग्याची काळजी सावंगी मेघे रुग्णालय आपुलकीने घेते, असे उद्गार ब्रिगेडियर कौशलेष पांघाल यांनी काढले. तर, महानगरातल्या सर्व वैद्यकीय सुविधा आज सावंगी रुग्णालयात उपलब्ध असून लोकांना आरोग्य सेवा देण्यास हे रुग्णालय तत्पर असते, असे मत अध्यक्षीय भाषणात शोभा तडस यांनी मांडले. प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. अभ्युदय मेघे यांनी सावंगी रुग्णालयात उपलब्ध अत्याधुनिक व सुसज्ज आरोग्य सेवांची माहिती देत गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन सुमित उगेमुगे यांनी केले व आभार डॉ. महाकाळकर यांनी मानले.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, मेडिसिन, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसारोग, श्वसनरोग, मूत्रविकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, मानसोपचार, त्वचारोग, दंतरोग व मौखिक आजार या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे रुग्णतपासणी, निदान व औषधोपचार निःशुल्क करण्यात आले. शिबिरातून ८२६ रुग्णांना अतिरिक्त उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी सावंगी रुग्णालयात भरती होण्याकरिता डॉक्टरांद्वारे रेफर करण्यात आले. या या शिबिरातील रुग्णांना सोनोग्राफी, एमआरआय, एक्सरे, रक्त व लघवी तपासणीसह सर्वसामान्य चाचण्या मोफत प्राप्त होणार असून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभही रुग्णांना प्राप्त करून दिला जाईल.
दिवसभर चाललेल्या या विशेष आरोग्य शिबिराच्या आयोजनात डॉ. अभय मुडे, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. रुपाली नाईक, डॉ. विठ्ठल शिंदे, डॉ. अभिषेक इंगोले, माधुरी ढोरे, राजेश सव्वालाखे, वैभव मेघे, सुशांत वानखेडे, राजेश सव्वालाखे, राकेश अगडे, जितेंद्र आगलावे, गंगाधर तडस, एन. पी. शिंगणे, विजय खैरे, अभिजीत वानखेडे, मनीष तेलरांधे, अनिल देशमुख, पवन कोळसे, अहिमेंद्र जैन ,अभिजीत राऊत ,रुपेश पांडे, मनोज महाजन, प्रतीक गडकरी, संदिप कुत्तरमारे, प्रवीण ढोकणे, निलेश ठाकरे, प्रफुल्ल गायकवाड, पंकज वानखेडे, मोहित सहारे, वर्धा सोशल फोरमचे रवींद्र कडू, सोहम पंड्या, श्याम परसोडकर, सुधाकर मेहरे, सावंगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, विविध विभाग प्रमुख, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, संपर्क प्रमुख व सक्रिय कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.