पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय मून यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते असे म्हणाले की, बाळ केशव ठाकरे हे एक धुरंदर राजकारणी उत्तम व्यंगचित्रकार शिवसेना पक्षाचे संस्थापक आणि सामना या दैनिकाचे संपादक होते. त्यांनी फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरीला होते. पुढे 1960 साली त्यांनी मार्मिक हे स्वतःचे साप्ताहिक सुरू केले. त्यानंतर 19 जून 1966 रोजी त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करून शिवसेना पक्षाच्या जाहीरनाम्यात ८० टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही त्यांच्या पक्षाची घोषणा होती. महाराष्ट्रात अनेक उद्योग असूनही मराठी  माणसाला काम नाही म्हणून त्यांनी मराठी माणसांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Advertisement
Netaji Subhash Chandra Bose and Balasaheb Thackeray Jayanti celebrated at Pandit Jawaharlal Nehru College

त्याचबरोबर  महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. सर्जेराव बनसोडे यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते असे म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक महान देशभक्त व शूर स्वातंत्र सेनानी होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांचे हे बलिदान आम्हा भारतीयांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे . या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस आर मंझा व प्रा दिगंबर गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक – शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंडित नलावडे यांनी केले तर आभार स्वाती नरवडे यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page