राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विदर्भ पाणी परिषदेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जनकल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती सभागृह धरमपेठ नागपूर येथे ७, ८ व ९ जून २०२५ रोजी विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ पाणी परिषदेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ३० मे पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवार दि. ७ जून रोजी पेयजल परिषद, रविवार, दि. ८ जून रोजी ‘कृषी जलपरिषद’ तर सोमवार दि. ९ जून रोजी औद्योगिक जलपरिषद होणार असून यावर आधारित विविध स्पर्धा होणार आहे. रील मेकिंग कॉम्पिटिशन, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन, मॉडल एक्झिबिशन कम कॉम्पिटिशन आणि रिसर्च पेपर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले आहे. रील मेकिंग स्पर्धेकरिता श्री जय गाला (७३८७०७७०८६), पोस्टर मेकिंग स्पर्धेकरिता श्री मुक्तानंद नवघरे (७३८७००३१२१), मॉडेल एक्झिबिशन स्पर्धेकरिता डॉ. अभय देशमुख (८३२९१७७९१) तर संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धेसाठी डॉ. योगेश मुरकुटे (९८२२२९६२९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत भव्य परिषदेचा भाग बनावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
