शिवाजी विद्यापीठात ”हवामान बदल आणि प्रसारमाध्यमे” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने दि. 25 जानेवारी 2024 रोजी हवामान बदल आणि प्रसारमाध्यमे या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली आहे. कुलगुरू प्रा. डॉ. दिंगबर शिर्के यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीत ही कार्यशाळा होईल.
कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील इंडियन एक्स्प्रेसचे असिस्टंट एडिटर पार्थसारथी बिस्वास आणि इंटरनॅशनल इन्टीट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अॅन्ड डेव्हलमेंटच्या प्रकल्प व्यवस्थापक इरा देऊळगावकर उपस्थित राहणार आहेत. याच कार्यशाळेत पार्षद शहा आणि पेषित शहा या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘पेव्हिंग ब्लॉक’ या शॉर्टफिल्मचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पर्यावरण प्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी तसेच पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.