डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गौतम बुद्ध यांची 2 हजार 569 वी जयंती साजरी
दख्खनमधील बौद्ध स्तुपाचा लोकाश्रयमुळेच विकास – इतिहास संशोधक डॉ श्रीकांत गणवीर यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : दख्खन प्रांत हा समृद्धतेने नटलेला असुन तेथील लोकाश्रय व राजाश्रयामुळेच बौद्ध बांधीव स्तुपाचा विकास झाला, असे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ श्रीकांत गणवीर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गौतम बुद्ध अध्यासन केंद्र व पाली व बुद्धीझम विभागातर्फे गौतम बुद्ध यांची 2 हजार 569 वी जयंती शनिवारी (दि.दहा) साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर हे होते. यावेळी ’डेक्कन कॉलेज’मधील इतिहासाचे अभ्यासक डॉ श्रीकांत गणवीर यांचे ’दख्खन प्रदेशातील बौध्द बांधीव स्थापत्य’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले भारतातील स्तुप संकल्पना, त्याचं जागतिक महत्त्व व उत्तर भारतातील स्तुप व दख्खन स्तुप वेगळेपण सांगितले आहे.

दख्खन प्रांतातील अमरावती, फनिगिरी, बावीकोंडा, आलुरा, कर्नाटकातील कनगंहल्ली या दख्खनमधील स्तुपाचे पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले. फनिगिरी व कनगंहल्ली या दोन स्तुपांची ठळठ वैशिष्ट्य सांगितले. त्यामुळे 40 प्रकारच्या वेगवेगळ्या विटाची निमित्ती, आयातजोता स्तंभ, वेगवेगळी प्रतिके, मंडप, तेलंगणातील व आंध्रप्रदेशात 275 वर बौद्ध स्थळ आढळून येतात. यामध्ये चुनखडीचे वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत. त्यांचे अनेक स्थापत्य शिल्प तेलंगण व आंध्र प्रदेशातील वेगवेगळ्या वस्तू संग्रहालय मोठ्या प्रमाणात दिसून येतील.
एक यक्ष साडेसात फुटाचा भेटला आहे. त्याच प्रमाणे पद्मनिधी, शंखनिधी यांचं स्पष्टीकरणासह सादरीकरण केले. कनंगहल्ली येथे सम्राट अशोकाचे अनेक शिल्पे मोठ्या प्रमाणात भेटली आहेत. त्याच प्रमाणे तेथे सातशे शिल्प व स्तंभ भेटली. चारशे शिलालेख सापडले आहेत सातवाहन घराण्यातील अनेक राजाचे शिल्प मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. महास्तुप हे शैक्षणिक केंद्र असून मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सोय होती. दख्खन स्तुपातुन हे वेगळेपण आपणास दिसून येते असे प्रतिपादन डॉ श्रीकांत गणवीर यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनाने झाली. कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरा किती महान होती. हे आपणास दख्खनच्या स्तुपातुन दिसुन येते. आपल्या अभ्यासाकरिता भारतीय ज्ञान परंपरा हा विषय प्रत्येक ज्ञान शाखेत असला पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक संचालक डॉ सुनिल नरवडे यांनी तर पाहुण्यांच्या परिचय डॉ संजय पाईकराव यांनी करून दिला. सूत्रसंचलन सचिन खंदारे व आभारप्रदर्शन पाली व बुद्धीझम विभागाचे प्रमुख डॉ शशांक सोनवणे यांनी केले.
या वेळी डॉ चंद्रकांत कोकाटे, डॉ आनंद उबाळे, डॉ अशोक पवार, डॉ बाळासाहेब अंभोरे, डॉ कुणाली बोदले, डॉ सोनाली म्हस्के, डॉ राहुल बचाटे, डॉ बाळासाहेब सराटे व विद्यापीठातील संशोधकांनी हजेरी लावली होती.