सौ के एस के महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

बीड : सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे  यांची जयंती  साजरी करण्यात आली. याप्रसंगी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयी बोलताना ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सुभाषचंद्र बोस यांचे महत्वाचे योगदान राहिलेले आहेे. त्यांचे कार्य आणि कर्तृत्व आजही युवकांना दिशा देणारे आहे.

Advertisement

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांचे कार्य फार मोलाचे आहे. ते एक राजकारणी, व्यंगचित्रकार, सामना दैनिकाचे संस्थापक आणि प्रमुख संपादकही होते. त्यांचे वडील प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍या  विरूध्द त्यांनी व्यंगचित्रातून  त्यांना वठणीवर आणले. त्यांनी मराठी माणसावर होणार्‍या अन्यायाविरूध्द आवाज उठविण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली ते हिंदु हृदयसम्राट व सरसेनापती या नावाने ओळखले जाऊ लागले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, पदव्युत्तर संचालक डॉ. सतिष माऊलगे, उपप्राचार्य डॉ नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालींदर कोळेकर, डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वांभर देशमाने, प्रा. घुमरे आमोल कर्मचारी प्रतिनिधी डॉ. विनायक चौधरी, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page