डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बोन्साय आर्ट कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन
वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा डॉ के प्रथापन
कोल्हापुर : एखाद्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी मुळांचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे मुळांवर काम करा. असे आवाहन डी वाय पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ के प्रथापन यांनी केले. विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने आयोजित बोन्साय आर्टवर प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ निशांत कडगे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. बोन्सायच्या विविध शैली आणि छाटणीचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सखोलपणे समजावले. सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृती करात सुंदर-सुंदर बोन्साय तयार करण्यासाठी झाडांची तंत्रशुद्ध छाटणी केली.
दरम्यान, सोमवार दि २१ एप्रिल रोजी कृषी अभियांत्रिकी विभागाच्यावतीने पालक-शिक्षक मेळावा संपन्न झाला. सहयोगी अधिष्ठाता डॉ मंगल पाटील शैक्षणिक प्रगती संदर्भात सादरीकरण केले.
अधिष्ठाता डॉ संग्राम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी शैक्षणिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
प्रस्तावना डॉ मंगल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ विनायक शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेसाठी डॉ संकेत सावंत, दीपक शिंदे यांनी मेहनत घेतली. द्वितीय वर्षाच्या गिरीजा खोत आणि प्रतिक्षा साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा डॉ के प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता, कॅम्पस डायरेक्टर डॉ सुहास पाटील, कुलसचिव प्रा डॉ जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.