एमजीएम विद्यापीठात नावीन्यपूर्ण ‘मेत्ता २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शैक्षणिक व तंत्रज्ञानात्मक विचारमंथन

छत्रपती संभाजीनगर | दि. १७ एप्रिल २०२५: महात्मा गांधी मिशन विद्यापीठात ‘गुणवत्ता हमी कक्ष’ यांच्यावतीने ‘मेत्ता २०२५’ (METTA 2025 – Minds Empowered Through Transformative Technology and Academic Synergy) या नावीन्यपूर्ण संवाद सत्राचा १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रूक्मिणी सभागृहात भव्य शुभारंभ होणार आहे. ‘Empowering Ideas, Transforming Futures’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात शिक्षण, संशोधन व उद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार असून, नव्या पिढीला प्रेरणादायी दिशा देण्याचा प्रयत्न होणार आहे.

विद्यापीठाने नावीन्यपूर्णतेचा स्वीकार:


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत एमजीएम विद्यापीठाने विविध मेजर-मायनर अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या विद्यापीठात ७ विद्याशाखांमध्ये सुमारे ३०० अभ्यासक्रम सुरू असून, उद्योग-संलग्न शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी भविष्यातील गरजांसाठी सक्षम होत आहेत.

‘मेत्ता २०२५’ मध्ये सहभागी होणारे प्रमुख वक्ते व विषय:

Advertisement


१. पद्मभूषण प्रा. डॉ. विजय भटकरउच्च शिक्षणाचे जागतिकीकरण व आंतरराष्ट्रीयीकरण
२. प्रा. डॉ. के. व्ही. काळेक्वांटम टेक्नॉलॉजी आणि डिजिटल पेडॅगॉजी
३. प्रा. डॉ. प्रशांत बोकारेमहाराष्ट्रातील शिक्षण – पुढील पाच वर्षे
४. प्रा. रजनीश कामतउद्योग-संलग्न शिक्षणकक्षाचा अनुभव
५. प्रा. डॉ. सुनील भागवतप्रयोगशाळेपासून बाजारपेठेपर्यंत – नवप्रवर्तन आणि उद्योजकता
६. श्री. कैलास देसाईउद्योग-शैक्षणिक सुसंवाद आणि कुशल मनुष्यबळ विकास
७. सौ. मोहिनी केळकरप्रथम पिढीतील उद्योजकांपासून स्टार्टअप्सपर्यंतचा प्रवास
८. श्री. अंकुशराव कदम, प्रा. डॉ. विलास सपकाळ, आणि डॉ. आशिष गाडेकर – एमजीएम विद्यापीठाचे प्रमुख पदाधिकारी

सर्वांसाठी खुला प्रवेश:
या संवाद सत्रात सहभागी होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना, संशोधकांना, शिक्षकांना, उद्योजकांना आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांना खुले आमंत्रण देण्यात आले आहे. ही एक दृष्टीकोन विस्तारणारी संधी ठरेल, ज्यामध्ये शैक्षणिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञानातील नव्याने उगम पावणाऱ्या संकल्पनांवर चर्चा होणार आहे.

उपक्रमाचा उद्देश:
विद्यापीठाच्या विकासात जागतिक दर्जाचे मार्गदर्शन मिळवून शिक्षण व संशोधनात उत्कृष्टता साधणे, हाच ‘मेत्ता’ उपक्रमाचा मूलभूत हेतू आहे. हा उपक्रम दरवर्षी आयोजित होणार असून, त्याच्या माध्यमातून नवकल्पनांना वाव मिळेल, आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षमपणे घडवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page