डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीर उत्साहात
राष्ट्रीय सेवा योजनामुळे जमिनीशी नाळ आणखी घट्ट होईल – प्रा प्रमोद पाटील
कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनामुळे विद्यार्थ्यांमधील सेवावृत्ती अधिक वृद्धिंगत होईल. समाजाप्रती जबाबदारीची भावना वाढीस लागेल. श्रमसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जमिनीशी असेलेले नाते अधिक मजबूत बनण्यास मदत होईल असा विश्वास ख्यातनाम प्रेरणादायी वक्ते विलासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाचे प्रा प्रमोद पाटील यांनी व्यक्त केला. डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभात प्रा पाटील बोलत होते.


वळीवडे (ता करवीर) येथे ७ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या काळात मोफत आरोग्य तपासणी शिबिर, स्वच्छता मोहीम, सामुदायिक सेवा प्रकल्प, महिला सक्षमीकरणासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, स्किट सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक, चित्रकला, योग ध्यान, संगणक साक्षरता, हस्तलेखन, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, रांगोळी आदी विविध उपक्रम राबवण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन प्रा प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ आर के शर्मा, कुलसचिव डॉ विश्वनाथ भोसले, संचालक (विद्यार्थी कल्याण) डॉ अद्वैत राठोड, संचालक (स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट) डॉ अजित पाटील, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ चंद्रप्रभू जंगमे, सरपंच रूपाली रणजीतसिंह कुसाळे, उपसरपंच वैजनाथ अशोककुमार गुरव, ग्रामसेवक महेश बाबुराव खाडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले.
प्रा पाटील म्हणाले, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे उत्तम सामाजिक संस्कार घडतात. विद्यार्थी आपल्या क्षेत्रात उत्तम अभ्यास, संशोधन करून नक्कीच यश मिळवतील. यशस्वी होण्यासाठी आपल्याला आकाश मोकळे आहे. पण कितीही मोठे झाला तरी पाय नेहमीच जमिनीवर राहिले पाहिजेत. हाच संदेश या शिबिरातून मिळेल याची खात्री आहे.
कुलगुरू डॉ आर के शर्मा म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य दिशेने चालण्याची प्रेरणा देईल.
कुलसचिव डॉ विश्वनाथ भोसले म्हणाले, या शिबिरानंतर विद्यार्थ्यांना नक्कीच सकारत्मक बदल जाणवेल.
डॉ अजित पाटील म्हणाले, विद्यार्थ्यानी नेहमी समाजात वावरले पाहिजे. त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग सामाजासाठी केला पाहिजे.
डॉ अद्वैत राठोड म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना आणि श्रमसंस्कार शिबिरांमुळे समाजसेवेची अधिक आवड निर्माण होईल.
सरपंच रूपाली कुसाळे म्हणल्या, आपण समाजाचे देणे लागतो हि भावना नेहमी ठेवावी. समाजासाठी जे काही चांगले करता येईल यासाठी नेहमी पुढाकार घ्यावा.
डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटच्या प्रकल्प अधिकारी रेणुका तुरंबेकर व सह प्रकल्प अधिकारी डॉ पुरुषोत्तम पेटारे तसेच डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ निखील नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. अक्षय भोसले, रोहन बुचडे यांनी परिश्रम घेतले.
कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए के गुप्ता यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.