डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ’एबीसी-आयडी’ संदर्भात प्राचार्य, विभागप्रमुखांची कार्यशाळा संपन्न

’एबीसी-आयडी’ विद्यार्थ्यांना नवीन ओळख देईल

कार्यशाळेत अभिषेक देव यांनी मार्गदर्शन केले.

छत्रपती संभाजीनगर : ’आधार’ कार्डमुळे प्रत्येक भारतीय नागरिकास ’युनिक आयडी’ व ओळख मिळाली. त्याप्रमाणेच ’अकॅडमिक बँड ऑफ केडिसस्’ (एबीसी-आयडी) विद्यार्थ्यांना स्वतंत्र व नवी ओळख निर्माण करुन देईल, असा सूर कार्यशाळेत निघाला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ’एबीसी-आयडी’ संदर्भात प्राचार्य, विभागप्रमुखांची कार्यशाळा शनिवारी (दि 30) नाटयगृहात घेण्यात आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ भारती गवळी, ’आयक्युसी’ तथा ’पीएम-एषा’ प्रकल्प समन्वयक डॉ जी डी खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर विषय तज्ज्ञ म्हणून ’डिजीटल इंडिया कॉपोरेशन’ चे राज्य समन्वयक अभिषेक देव, छत्तीसगड राज्य समन्वयक रोहित सिंग, ’युनिक’चे संचालक डॉ प्रवीण यन्नावार यांची उपस्थिती होती.

Advertisement

संचालक डॉ भारती गवळी प्रास्ताविकात म्हणाल्या, आपल्या विद्यापीठात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रमाची फेररचना, परीक्षा व मूल्यांकन पध्दतीत बदल प्रभावीपणे अंमलात आल्यात आलेले आहेत. बँकेतील खात्यात असलेल्या क्रेडिटवरुन जशी आपली श्रीमंती, बाजारातील किंमत ठरत असते. त्याप्रमाणे आता आगाती काळात विद्यार्थ्यांचे ’एबीसी’ खाते ही महत्वाची ओळख असणार आहे. पूर्वी ’सेवायोजना’ कार्यालयाकडून नोकरीसाठी कॉल येत असत, आगाती काळात ’एबीसी’ खात्यावरुन नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

डॉ जी डी खेडकर म्हणाले, ’पीएम-उषा’ अंतर्गत चार घटकांवर काम केले जात आहे. ’सॉफ्ट कॉमोनंट’ अंंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. राज्यातील सर्व विद्यापीठात अभ्यासक्रम, परीक्षा व मुल्याकंन पध्दती काही प्रमाणता सारखेपणा येण्याची शक्यता आहे. ’अभिषेक देव’ यांनी ’पॉवर पॉईंट’ प्रेझेंटेशन द्वारे ’एबीसी-आयडी’, एनएडी, डिजी लॉकर व ’अपार आयडी’ या संदर्भात माहिती दिली. जुलै २०२५ पासून ’डिजीटल इंडिया’ हा पंतप्रधानाचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बँकेपासून ते प्रत्येक व्यवहारासाठी नागरिकांची ’लाईन’ कमी होऊन ’ऑनलाईन’ कारभार होत आहे. तसेच लोकांची रांग अर्थात ’क्यु’ कमी होऊन ’क्यु आर कोड’ला महत्व प्राप्त झाले आहे.

’एबीसी-आयडी’ मुळे विद्यार्थ्यांना ’मल्टीपल एन्ट्री व एक्झीट’ सोपे होईल. तर दहावी, बारावी, पदवीचे निकाल, गुणपत्रिका, पदवी सर्व प्रकारच्या सीईटी चे निकाल उपलब्ध होतील. हा ’आयडी’च विद्यार्थ्यांनी नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वासही अभिषेक सिंग यांनी व्यक्त केला. यावेळी रोहित सिंग यांनीही मार्गदर्शन केले. प्रोग्रामर राजेश राठोड यांनी दत्तात्रय पर्वत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page