एमजीएम विद्यापीठामध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
परिषदेत सक्षमीकरणाव्दारे सर्वसमावेशक विकास विषयावर होणार चर्चा
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च आणि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लॅग्वेजस यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षमीकरणाव्दारे सर्वसमावेशक विकास या विषयावर एमजीएम विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुलपती अंकुशराव कदम व कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या परिषदेला उद्घाटक म्हणून गोवा प्रांताचे लोकायुक्त आंबादास जोशी हे उपस्थित राहणार असून समारोप सोहळ्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुळजापूरचे उपसंचालक प्रा. डॉ. रमेश जारे हे उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय परिषेदला सामाजिक शास्त्र, कायदा व भाषेच्या अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके आणि या परिषदेच्या समन्वयक डॉ. झरताब अन्सारी यांनी केले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी https://erp.mgmu.ac.in/asd_EventPublicUserMaster.htm?eventID=85 या लिंकवर जाऊन इच्छुक नोंदणी करू शकतात तसेच परिषदेसंदर्भात अधिक माहितीसाठी ९८५०५५३१६३ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.